तभा वृत्तसेवा
पुसद,
satish-chiddarwar : आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून विदर्भाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. सतीश चिद्दरवार यांच्या कार्याची ‘रिसिल ग्रुपच्या’ वतीने दखल घेण्यात आली. सोलिटेर हॉटेल अँड बॅक्वेट्स नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते व विविध मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सतीश चिद्दरवार यांना ‘विदर्भ रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी नागपूर येथे ‘सुखकर्ता नागरी’ प्रकल्प पंतप्रधान निवास योजनेतंर्गत नागपूरात मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांचं स्वप्नपूर्ती केली आहे. या कार्यक्रमात विदर्भातील नामवंत उद्योजक, व्यावसायिक व विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. विदर्भाच्या विकासामध्ये व्यावसायिक वैद्यकीय क्षेत्रात आणि जमीन विकासाक तसेच बांधकाम क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून विदर्भाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम डॉ. चिद्दरवार यांनी केले आहे. त्यांनी ‘सुखकर्ता नागरी’ प्रकल्प पंतप्रधान निवास योजनेंतर्गत नागपूर येथे 900 च्या वर मध्यमवर्गीय नागरिकांच्या घरांचं स्वप्नपूर्ती करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रथम 100 घरांचे हस्तांतरण केले आहे. हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्यामुळे 19 जुलै रोजी ‘रिसिल ग्रुप’च्या वतीने त्यांना पुरस्कृत करण्यात आले.