जिल्हाभर आशा अंगणवाडी कर्मचार्‍यांचे ग्रामपंचायत कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
aasha anganwadi karmcharyanche andolan संपूर्ण जिल्हा भर सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्स संघटनेच्या वतीने आपल्या हक्काचा २३ महिन्यांचा थकीत असलेला कोरोणा प्रोत्साहन भत्ता मिळावा म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचर ह्या आपल्या ग्रामपंचायत कार्यालया समोर दि. १ जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन करित आहेत.
 
 
asha
 
यांनी गेल्या ५ वर्षा पूर्वी जागतिक कोविड -१९ ची महामारी आली होती. त्यामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन आरोग्य विषयक जनजागृती केली.अनेकांचे जीव सुद्धा वाचवले.त्यामधे काही आशा वर्कर्सला व त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींला प्राण सुद्धा गमवावे लागले.त्यावेळी सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना कोरोणा महामारी अस्तित्वात असे पर्यंत २ वर्षासाठी १ हजार रुपये प्रतिमहा प्रमाणे कोरोणा प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायत कार्यालय स्तरावरून देण्याचा निर्णय घेतला.तसे वेळोवेळी परिपत्रक सुद्धा काढले.गेल्या ५ वर्षात अनेक वेगवेगळ्या प्रकारचा निधी ग्रामपंचायतीला आला.परंतू या आलेल्या निधीतून एक रूपया सुद्धा या कोरोणा योद्ध्याला ग्रामपंचायत कडून देण्यात आला नाही.
 
 
महिला तोच २३ महिन्यांचा कोरोणा प्रोत्साहन भत्ता मिळावा म्हणून आपल्या ग्रामपंचायत कार्यालया समोर सीटूच्या नेत्रुत्वात बेमुदत धरणे आंदोलन करित आहेत. महिला आपल्या ग्रामपंचायत कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करित आहेत. त्यांना आजही उडवाउडवीची उत्तरे ग्रामपंचायत कार्यालया कडून तसेच गटविकास अधिकार्‍यां कडून दिली जात जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात सूरू असलेलं आंदोलन जो पर्यंत ठोस निर्णय लागत नाही, तो पर्यंत सूरूच राहील असा निर्णय सीआयटीयूच्या वतीने घेण्यात आला आहे. अपेक्षित न्याय मिळाला नाही तर सीटूच्या वतीने १० जुलै रोजी तालुका स्तरावर मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीटूच्या वतीने जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा पाटील,मंदा मसाळ, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या सचिव जयश्री तायडे, ललिता बोदडे, राजेश्री नेमाडे, रश्मी दुबे,मंदा मसाळ, सुलोचना गाडेकर,शारदा इंगळे,स्वाती आहेर, वनिता वराडे,साधना खिल्लारे, इत्यादीनी केले आहे.