विदर्भातील नदीजोड प्रकल्पाला नागोरावजी गवळी यांचे नाव द्या : विजयराज शिंदे

    दिनांक :03-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
River-linking project in Vidarbha संघाच्या सर्व सरसंघचालकांसोबत संपूर्ण विदर्भात काम केलेले. प.पू. सुदर्शनजी व मोहनजी यांचे संघ शिक्षा वर्गातील शिक्षक राहिलेले संघाच्या प्रतिनिधी सभेत श्रद्धांजली अर्पित केलेले. आणीबाणीतील जेष्ठ लोकतंत्र सेनानी नागोरावजी गवळी हे एक प्रसिद्धीपरान्मुख संघयोगी होते. संघाचे काम विदर्भभर करीत असताना, ते विविध योग्यतेच्या कार्यकर्त्यांचा शोध घेत. संघ परिवारातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, कृषी क्षेत्रातील सर्व संघटना उभारतांना स्वतः अलिप्त राहून कार्य उभारणारे ते एक लोकविलक्षण लोकनेते होते. एखाद्या विधायक कार्याला उपहास, विरोध व स्वीकृती या कालखंडातून जावे लागते .त्या त्या कालखंडात कार्यकर्त्यांना धीर देऊन सांभाळण्याची त्यांना हातोटी होती.
 
 
devendra
 
विदर्भातील प्रारंभिक संघ व संघ परिवार उभारणीतील एक शतायुषी साक्षीपुरुष म्हणून सरसंघचालक मोहनजी भागवत त्यांना विदर्भ आर एस एस चे भीष्माचार्य संबोधित. देशाकरिता विकासाकरिता विविध क्षेत्राची उभारणी आवश्यक असते. त्यामुळे आयुष्याच्या शेवटी ते किसान क्षेत्राच्या उभारणीला लागलेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भाची लाईफ लाईन म्हणून ते वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पा कडे बघत. आणि यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत आग्रही राहिले. त्यांच्या याच कार्याला योग्य न्याय देण्याकरिता लोकतंत्र सेनानी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पूर्व खा. कैलास सोनी यांनी यासाठी आग्रह धरला. त्यांच्या या आग्रहाच्या समर्थनार्थ विदर्भातील सर्वपक्षीय आमदार, खासदार, राज्यातील व केंद्रातील मंत्री समवेत, विदर्भातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी मुख्यमंत्री नावाने आपली शिफारस पत्रे दिली. विदर्भातील या सर्व लोकभावनेच्या आदर राखावा. या निवेदनास्तव बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माजी आ. विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आग्रही मागणी केली.