तभा वृत्तसेवा
उमरखेड,
aadhaar-e-kyc : कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकèयांसाठी अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत करण्यात येणारी आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेसाठी कोणत्याही शेतकèयाकडून सेवा शुल्क, सुविधा शुल्क किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांना दिले आहेत.
राज्य शासनाच्या निर्देशांनुसार ही सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे. केंद्र चालकांना शासनाकडून आधार इकेवायसी नियमांनुसार सेवा शुल्क अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकèयांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व सेवा केंद्रांना लाभार्थ्यांना ही सेवा मोफत असल्याची स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणत्याही केंद्राकडून शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा पडताळणीत असे आढळल्यास संबंधितांविरुद्ध शासन नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे पात्र शेतकèयांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार असून, कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकèयांना लाभ होणार असल्याने शेतकèयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सेवाशुल्क आकारल्यास कार्यवाही
कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या सर्व शेतकèयांनी जवळच्या सेतू केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार इकेवायसी मोफत करून घ्यावी. केंद्रचालकाने त्याचे सेवा शुल्क आकारल्यास रीतसर तक्रार करावी, त्याची चौकशी करून त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- राजेश सुरडकर
तहसीलदार, उमरखेड