तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला शिक्षकाचा भयंकर प्रताप

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
अहिल्यानगर
Ahmednagar School Incident वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणानंतर एका प्राचार्यांनी केलेल्या कथित कृत्यामुळे खळबळ उडाली आहे. “भांडण कसे करतात ते दाखवतो,” असे म्हणत प्राचार्यांनी तक्रार करणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा पकडून त्याला हवेत उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमारे वीस सेकंद एक ते वीस आकडे मोजत त्यांनी विद्यार्थ्याला हवेत धरून ठेवले आणि खाली सोडल्यानंतर त्याच्या हाताचा चावा घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
 

Ahmednagar School Incident Principal Accused of Biting Class 3 Student’s Hand After Fight 
वर्गात आल्यानंतर भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कान पिळल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर प्राचार्यांनी रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्यासोबत हे कृत्य केल्याचा आरोप आहे.
घरी गेल्यानंतर मुलाच्या हातावरील जखम आणि त्याची झालेली अवस्था पाहून ही घटना पालकांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकारानंतर पालकांनी प्राचार्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “माझ्याकडून चुकून ही घटना घडली. मी लेखी माफी मागतो,” असे प्राचार्यांनी सांगितल्याचा दावा पालकांनी केला आहे.मात्र, एका लहान मुलावर अशा Ahmednagar School Incident  प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करणे हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत संबंधित प्राचार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.