बाभुळगाव तालुक्यात साडेतीन हजार हेक्टर जमिनीवरील शेतपिकांचे नुकसान

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
damage-to-crops : कमी वेळात अधिक पाऊस कोसळल्याने तालुक्यातील सर्व परिसर जलमय झाला. गुरूवार, 30 जुलै रोजी मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळला. मुसळधार पावसाने तालुक्यातील साडेतीन हजार हेक्टरच्यावर शेतपिक बाधित झाली आहे. तर अनेक घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झालेली आहे. शेतशिवारात जलसंचय झाल्याने शेतकèयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील सर्वच नद्या तुडूंब भरून वाहू लागल्या आहे.
 
 
y31July-Bembala
 
बाभूळगाव तालुक्यातील सावंगी मांग व कानगोकूळ शेतशिवार पुराच्या पाण्यामुळे पुर्णतः पाण्याखाली गेलेले आहे. तर तालुक्यातील वेणी (50 हे.), कोठा (120 हे.) नायगाव (7), पिंपरी (12), इंदिरा नगर (13), नांदुरा खु. (12), मुबारकपूर (75), सारफळी (300) गवंडी (340), खर्डा (360), गोंधळी (50), प्रतापपूर (30), खडकसावंगा (22), वाटखेड बु. (300), वाटखेड खु. 200, नांदेसावंगी (100) भैय्यापूर (51), नागरगाव (50), तांबा (100), नांदुरा बु. (100), कोपरा 2 (80), बाभूळगाव (70), कोटंबा (6), नायगाव (7), देवगाव (5), कोंढा (30) हस्तापूर (150), सुहागपूर (60), मिटणापूर (50), वेणी (20), राणी अमरावती (15), पालोती (60), सारफळी (12), गवंडी (20), खर्डा (20), पहूर (14), घारफळ (12), पंचगव्हाण (10), वाई (8), सरूळ (6) महंमदपूर (4), बागवाडी (6), बारड पु. (3) असे आता पर्यंत 3 हजार 44 एवढ्या हेक्टरवर शेतपिके पाण्याखाली सापडलेली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान बेंबळा धरणाचे पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावातील शेतशिवारात पुराचे पाणी शिरले असल्याने शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
बेंबळाचे सर्वच दरवाजे उघडले
 
 
बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढत असल्याने प्रकल्पाची जलपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी 31 जुलै रोजी पहाटे 4 वाजता बेंबळा धरणाचे विसही दरवाजे 50 सेंटीमिटरने उघडण्यात आले. 1 हजार घमी प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग बेंबळा नदीपात्रात करण्यात आला आहे. दरम्यान बेंबळा नदी दुथडी वाहत असल्याने बाभुळगाव शहरालगत असणाèया उत्तरवाहीनी नारायणी नदीच्या पुराचे पाणी मागे सरकत असल्याने शहराच्या काही भागात पुराचे पाणी शिरले आहे.