आपत्काळातून तारण्यासाठी साधनेला पर्याय नाही : डॉ. भारती हेडाऊ

सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
वर्धा,
Guru Purnima Festival by Sanatan Sanstha संपूर्ण जगावर घोंघावणार्या तिसर्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला नैराश्येने ग्रासले आहे. अशा भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित रामराज्याची नितांत आवश्यकता आहे; मात्र हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला साधनेचे आणि गुरुचरणांचे भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या डॉ. भारती हेडाऊ यांनी केले.सनातन संस्थेच्या वतीने २९ रोजी स्थानिक दादाजी धुनीवाले मठ सभागृहात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी सनातनचे धर्मप्रचारक संत अशोक पात्रीकर, विनोद महाराज फुकट, तुकाराम घोडे, लता तिवारी, प्राचार्य धर्मेंद्र मुंदडा यांची उपस्थिती होती.
 
 

डफरी  
यावेळी प्राचार्य धर्मेंद्र मुंदडा म्हणाले, पूर्वी आपल्या देशात संयुक्त कुटुंब पद्धती होती. एका कुटुंबात अनेकजण राहत होते; परंतु आता पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आपण सर्व भारतीय संस्कृती विसरत चाललो आहोत. त्यामुळे आपण आपले सण, उत्सव, आपली भाषा आणि वेशभूषा जतन करून संस्कृती टिकवण्यासाठी सहभाग दिला पाहिजे. त्यामुळे आपले कुटुंब, समाज, राष्ट्र आणि धर्म सुरक्षित राहील. हिंदू संस्कृती टिकली, तर राष्ट्र आणि आपला धर्म यांचेही रक्षण होणार आहे आणि त्याचा प्रारंभ आपल्या घरापासूनच करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.या महोत्सवात प्रारंभी व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, संदेश वाचन करण्यात आले. बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त सिद्धी हिवसे हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक संकल्प आणि नामजप करण्यात आला. गुरुपौर्णिमा महोत्सवाला सनातनचे साधक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.