बांगलादेशात येताच हसीनांना अटक करणार: असदुझमान

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
ढाका,
hasina will be arrested माजी पंतप्रधान शेख हसीना बांगलादेशात येताच त्यांना अटक करून तुरुंगात टाकले जाईल. देशाचा कायदा त्याचे काम करेल. हसीना यांनी आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांना तशी संधी मिळणार नाही, त्यांना शिक्षा भोगावीच लागेल, असे बांगलादेशचे कायदा मंत्री मोहम्मद असदुझमान यांनी सांगितले. बांगलादेशच्या कायदा मंत्र्यांनी सचिवालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले की, एखाद्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा झाली असली, आणि ती बांगलादेशी नागरिक असली, देशाच्या कायद्यांचा आदर करत असली आणि बांगलादेशात येऊन आत्मसमर्पण करू इच्छित असली, तरी आत्मसमर्पण करण्यापूर्वीच तिला अटक केली जाऊ शकते.
 
 
hasina will be arrested
 
सरकार कायद्याच्या बाहेर जाऊन काहीही करणार नाही. हसीना यांनी मायदेशी परतल्यावर त्यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना शिक्षा भोगावी लागेल. आम्ही कायद्याच्या बाहेर काहीही करणार नाही. कायद्याने आम्हाला दिलेल्या अधिकारांचा आम्ही वापर करू असेही त्यांनी नमूद केले. पासपोर्ट नसल्यामुळे शेख हसीना कशा परत येतील. यावर उत्तर देताना कायदा मंत्री म्हणाले, त्या कशा येतात ही त्यांची समस्या आहे. ती माझी समस्या नाही. जेव्हा त्या आमच्या हद्दीत प्रवेश करतील, तेव्हा कायद्याने आम्हाला दिलेल्या अधिकारानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.