माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण

माझे कम्पस

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
अभिजित वर्तक
campus memories गौरी बेलन (पांढरे) - आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य नायडू सरांचे हे उद्‌गार आजही कानात घुमतात, दक्षिण नागपुरातील दर्जेदार शिक्षणाचे केंद्र असलेले मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले. बालपणापासून कला, कविता, वक्तृत्व आणि नाट्यप्रयोगांत रमणारी मी विज्ञान शाखेत जाईन, असे माझ्या शाळेतील शिक्षकांनाही वाटत नव्हते. पण 'कला मन समूद्ध करते, तर विज्ञान काळाची गरज आहे, या वडिलांच्या विचारामुळे १९९१ मध्ये मी मोहता महाविद्यालयात प्रवेश घेतला.
 
 

grh 
शाळेतील जिव्हाळ्याच्या वातावरणातून कॉलेजमध्ये आल्यावर सुरुवातीला बोडो बुजले. मात्र वेलीबृक्षांनी नटलेला परिसर, फुलांच्या कुंडया, कारंज्याचे तुषार आणि रम्य वातावरणात विज्ञानाच्या अभ्यासाबरोबरच साहित्यप्रेमही अधिक फुलवत ठेवले. विज्ञानाबरोबरच कला, साहित्याचा मेळ घालून जोबनातील तणाव व्यवस्थापनाचं प्राथमिक शिक्षण मला माझ्या कॅम्पसमधूनच मिळाले हे व्यता समजतंय्, एखादा तास मोकळा मिळाला की सरळ आमच्या समृद्ध ग्रंथालयात जाऊन बाचनात रमायचे.
कॉलेज सुरू झाल्यानंतर निवडणुकांचे वातावरण रंगले आणि माझ्यातील कववित्री जागी होऊन उमेदवारांसाठी लिहिलेल्या 'चारोळ्यांना' मित्र-मैत्रिणींनी भरभरून दिलेली दाद अजूनही स्मरते. माझ्यातील कलागुण ओळखून उप-प्राचार्य गोमकाळे सर, ओखंडे सर आणि प्रा. जैमिनी कडू सर यांनी वक्तृत्व, वादविवाद आणि विविध सांस्कृतिक स्पर्धासाठी प्रोत्साहन दिले. विज्ञान शाखेचा अभ्यास जरा जास्तच, तरीही कला-साहित्याशी जपलेली मैत्री अधिकच दृढ होत गेली ती केवळ कॅम्पस परिसरातील प्रत्येक प्राध्यापकांमुळे आपल्याला कलेपासून कोणीही दूर करू नये म्हणून अभ्यासही जोमाने करायचा. कारण चुकून विपय कभी राहिला तर त्याचं अतिरिक्त शुल्क वडिलांकडे मागण्याची हिंमतच मुळी होणार नकती, आणि सुदैवाने तशी वेळ कधीच आली नाही. प्रथम श्रेणीत मिळालेली डिग्रो चधून आभाळ ठेंगणे झाले होते. त्याच वेळेस संस्कृत राज्य नाट्य माहोत्सवात अभिनयाचे पारितोषिकती मिळालं होतं. शिवाजी सायन्सला शिकणारा माझा धाकटा भाऊ आनंद पांढरे प्रत्येक टप्प्यावर माझं सुरक्षित कवच बनून सतत काळजी घेत असे. कारण माझी गाडी सुसाट वेगाने धावायची नां। विविध स्पर्धा, परीक्षा आणि कॉलेजमधील उपक्रम.....
 
 
 
राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धांसाठी जयसिंगपूरसाठी केलेला प्रयास आजही आठवतो. जैमिनी कडू सरांच्या नेतृत्वात प्रवासभर स्वरचित चारोळ्यांची अंत्याक्षरी, ज्वलंत मुद्यांवरील उस्फूर्त वक्तृत्व तर कभी जोरजोराने घातलेला वादविवाद। तेव्हाच्या खळाळून हसण्याचा आवाज अजूनही कानात घुमती. मोहता सायन्सच्या टीमची मजा बघण्यासाठी बोगीजवळ खुप गर्दी जमायची, आमच्यासारखी मजा कोणी केलीच नसावी असंच मला अजुनही वाटतं! सगळंच कसं अद्भुत, रोमांचक आणि कधीही संपू नये असे दिवस कापरासारखे उडून गेलेत. मायमराठीतही भरभरून लिहिण्याचे स्वप्न वैवाहिक जीवनात केलेल्या एम. ए. दरम्यान पूर्ण झाले, मोहता महाविद्यालयाने मला फेवळ विज्ञानाची पदवी दिली नाही, तर विचारांची समृद्धी, वाचनाची सवड, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाला नवी दिला दिली. आणि मुख्य म्हणजे शेकडो जिव्हाळ्याचे हुशार मित्र-मैत्रिणी मिळालेले आहेत, जे आजही विविध क्षेत्रात अग्रेसर असून एकमेकांच्या संपर्कात आहेत. कॉलेज सुटल्यानंतरही 'फ्रेंड्स वल्र्ड' नावाचा ग्रुप तयार होऊन 'जाणता राजा' नाटक स्थिर रंगमंचावर आणणारा आमचा कलासक्त मित्रपरिवार नागपुरात आहे. त्यानिमित्ताने थोर इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे आणि सद्‌गुरुदास महाराजांचा आम्हाला जवळून सहवास लाभल्याने आमच्या सगळ्यांच्याच जीवनाचे सोने झाले आहे. सुसंवाद आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्भवपणे पुढे जायचं हे कौशल्य मला माझ्या कॉलेज कॅम्पस कडूनच मिळालेलं आहे