अत्याचार करणार्‍या नराधमास २० वर्षांचा कारावास

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
वाशीम, 
Imprisonment for the perpetrator येडशी (कुंड) येथे पाहूणा म्हणून आलेल्या एका नराधमाने साडूच्या मुलीस लग्न करण्याचे आमिष दाखवून पुण्यात अत्याचार केल्याप्रकरणी भांदविच्या विविध कलमान्वये तसेच पोसो कायद्यान्वये सुमारे २० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगरुळनाथ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी ३० जुलै रोजी हा निकाल दिला आहे. याबाबत थोडयात माहिती अशी की, सन २०२१ मध्ये मंगरुळनाथ तालुयातील मानोरा पोलिस स्टेशन हद्दीतील येडशी (कुंड) येथील आरोपी हा पाहूणा म्हणून साडूच्या घरी गेला होता. त्याने साडूच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पुणे ़येथे पळवून नेले. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी मानोरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३६३, ३६६ (अ) तसेच पोसो कायद्याचे कलम ४, ५ सहकलम ६ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी करुन तपासाअंती मंगरुळनाथ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
 

Imprisonment for the perpetrator 
 
 
न्यायाधीश प्रज्ञा एस काळे यांनी दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकला. न्यायालयात सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी निकाल देतांना भादंवि ३६३ मध्ये तीन वर्षे साधा कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. भादंवि ३६६ नुसार पाच वर्षे साधा कारावास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच पोसो कायद्यातील ४, ५ व सहकलम ६ च्या तरतुदीनुसार आरोपीला सुमारे २० वर्षांचा सक्षम कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. दंडाच्या रकमेतून पीडितेला सात हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिल आहेत. या प्रकणात अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एस. के. गिमेकर यांनी सरकारच्यावतीने युक्तिवाद केला. तर एएसआय नामदेव बावणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.