ऑक्सफर्ड ऑफ द इस्टची पत घसरतेय्

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
शशांक तांबे
oxford of the east शिक्षणाचं क्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' असे बिरुद मिरवणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विविध प्रकरणांनी गाजत आहे. १० फेब्रुवारी १९४९ या दिवशी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. यावेळी डॉ. एम. आर. जयकर हे कुलगुरू होते. पुणे विद्यापीठाचा नाव लौकिक जगभरात होता. पण आता ही प्रतिमा डागाळते आहे.
 
 

oxford of the east losing its prestige: savitribai phule pune university faces scrutiny
गेल्या काही वर्षांपासून पुणे विद्यापीठाचे नाव आर्थिक घोटाळे, खून, छेडछाड या प्रकरणांमध्ये समोर आले आहे. राज्यातील तीन प्रमुख सार्वजनिक विद्यापीठांच्या आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले असून यात पुणे विद्यापीठाचा समावेश आहे.
पुणे विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांची वर्ष २०१७-१८ ते २०२५-२६ पर्यंतची तपासणी होणार आहे. या ऑडिटमध्ये आर्थिक व्यवहार, खरेदी प्रक्रिया, निविदा, प्रकल्प खर्च, निधी व्यवस्थापन, प्रवेश प्रक्रिया आणि संशोधन अनुदान यांचा समावेश असेल. फेक कर्मचारी, अनधिकृत पेमेंट्स, ग्रँट्सचा दुरुपयोग आदी गैरव्यवहारांच्या शक्यताही तपासल्या जात आहेत.गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेच्या अनेक तक्रारी विद्यापीठाच्या अधिसभेत चर्चिल्या गेल्या होत्या. कॅग अहवाल, खरेदी प्रक्रियेत अनियमितता, आदिवासी विभागातील कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांसह विविध आरोप समोर आले होते. अधिसभा सदस्यांनी वारंवार फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केली होती. याच पृष्ठभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. ऑडिट अहवालानंतर दोषी आढळल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या ऑडिटसाठी मुकुंद एम. चिटाळे अँड कंपनीची नेमणूक केली गेली आहे. जागतिक स्तरावरील २०२३ मधील मानांकनात पुणे विद्यापीठ हे ४५४-४६० या गटात होते. पण यंदा थेट ७९१-८०० या गटात फेकले गेले आहे.
विद्यापीठातील नियुक्त्यांमधील विलंब, रिक्त पदे, आर्थिक धोरणातील त्रुटी याचा हा परिणाम आहे. विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्राध्यापक भरती यात राजकीय हस्तक्षेप वाढला ढला आहे. असा आरोप केला जात आहे. त्यात आता विद्यापीठात बनावट पदवी प्रकरण समोर आले आहे. यामुळे विद्यापीठाचे नाव वेगळ्याच अर्थाने समोर आले. जगभरात नावलौकिक असणाऱ्या विद्यापीठात पैसे देऊन पदवी मिळत असल्याचे समोर आले आहे. यात विद्यापीठाने पोलिसात तक्रार केली आहे. त्यावरून गुन्हादेखील दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करतीलच. परंतु या गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे