तभा वृत्तसेवा
आर्णी/दारव्हा,
car-was-washed-away-in-the-flood : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री दहेली येथील कपुटी नदीवरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रचंड प्रवाहात एक कार वाहून गेली. या दुर्घटनेत आईसह दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे मृतदेह पात्रातच सकाळी 11 वाजता मिळाले. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती. तर वडीलांनी झाडाचा आसरा घेतल्याने त्यांचा जीव वाचला.
आर्णी तालुक्यातील लोणी येथील अविनाश नामदेव खंडारे हे आपल्या कुटुंबासह राळेगाव येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते रात्री उशिरा राळेगाव येथून निघाले. त्यांच्यासोबत बोरी चंद्रशेखर येथिल नातेवाईक होते. त्यांना बोरी अरब येथे सोडून ते लोणीकडे नाघाले. रात्री 12 च्यादरम्यान दहेली गावाजवळ कुपटी नदी वरील पुलावरुन वाहत असणाèया पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी वाहु लागली. कसेबसे अविनाश यांनी झाडाची फांदी पकडली मात्र पत्नी व मुलिंना ते बाहेर काढू शकले नाही. कार पुरात पत्नी व मुलिंसह वाहून गेली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, वेगवान प्रवाहामुळे त्यांची पत्नी व दोन मुलींना वाचवता आले नाही.
माधवी अविनाश खंडारे (वय 42) असे पत्नीचे तर साची अविनाश खंडारे (वय 17) व प्राची अविनाश खंडारे (वय 11) अशी त्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस, महसूल विभाग आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली होती. रात्रीच यवतमाळ येथील बचाव पथक आले होते. त्यांनी झाडावर चढलेल्या अविनाश खंडारे यांना पुरातुन बाहेर काढले. तर रात्री माय लेकींचा शोध घेऊनही ते सापडले नाही. अखेर शुक्रवारी दुपारी नदिपात्रात पुला पासुन अर्धा कालोमाटर दुर डोहात कारमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेमुळे लोणी परिसरात शोककळा पसरली असून खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.