गगनयान अंतराळवीर कॅप्टन अंगद प्रताप यांचा तरुणांना यशाचा मंत्र

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
Astronaut Captain Angad Pratap भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मानव अंतराळ मोहिमेसाठी निवड झालेले भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप यांनी बुलढाण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशासाठी पुस्तकी ज्ञानासोबत योग्य दृष्टिकोन आणि कौशल्येही तितकीच महत्त्वाची आहेत, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे शहरातील विद्यार्थ्यांना देशाच्या पहिल्या मानव अंतराळ मोहिमेशी थेट जोडले जाण्याची दुर्मीळ संधी लाभली. सामाजिक कार्यकर्त्या कै. अरुणाताई कुल्ली यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष फाऊंडेशनतर्फे गर्दे वाचनालय १ जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
Angad Pratap
 
लढाऊ वैमानिक ते अंतराळवीर असा प्रवास उलगडताना त्यांनी गगनयान मोहिमेतील प्रशिक्षण, तांत्रिक तयारी आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. अंतराळवीर होणे म्हणजे विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये सातत्याने स्वतःला विकसित करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच अनेक बाबींचा त्यांनी उहापोह केला. अध्यक्षस्थानी कर्नल सुहास जतकर होते. यावेळी कॅप्टन महेंद्रकुमार, प्रा. डॉ. कि. वा. वाघ यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सुजाता कुल्लींनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनोद देशमुख यांनी केले.