आठ सायकलपटू निघाले वारीला
भंडारा :
Pandharpur Cycle Wari बायसिकल असोसिएशन भंडारा तर्फे भंडारा ते पंढरपूर अशी सायकलवारी काढण्यात आली आहे. या वारीची सुरूवात आज शनिवार 4 जुलै रोजी सकाळी बहिरंगेश्वर मंदिर परिसरातून मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरण झाली.
हे वारकरी भंडारा येथून पंढरपूर असा ७५० किलोमीटर चा प्रवास सायकलने करणार करून पंढरपूर येथे रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये अमोल वाडीभस्मे, अमोल मानापूरे, दादा ठाकरे, सुधीर गायधने, राजकुमार बावनकर, प्रमोद नेवारे, डॉ. अजय आगासे, प्रविण कारेमोरे यांचा समावेश आहे. वारीला सुरूवात करण्यापुर्वी सायकलप्रेमींनी नगर प्रदक्षीणा करून पंढरपूर करिता निघालेल्या वारकर्यांना शुभेच्छा दिल्या. शास्त्री चौक येथे सतीश तुरकर यांनी वारीचे स्वागत केले. पुढे वारी विठ्ठल रुक्माई मंदिरात पोहोचली. नंतर गांधी चौक येथे वारीने रिंगण घातले व वारी पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक व राजीव गांधी चौकात रिंगण करत बहिरंगेश्वर मंदिर गाठले. राजीव गांधी चौक येथे राजगोपालाचारी वार्ड मित्र परिवार तर्फे या वारकरी मंडळींनी पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मधुरा मदनकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आशू गांेडाणे, सभापती ऋषाली ब्राह्मणकर, प्रिती गाढवे, नगरसेवक मंगेश वंजारी, नितीन गायधने, रुपाली नेवारे, जयश्री बोरकर, शैलेश डुंभरे, सुर्या गिरेपुंजे, बालू कढव, विकास घाटबांधे, संजय मदनकर, पंकज हरडे, ओंकार नखाते, प्रफुल्ल ढोमणे, विजय काकडे, भुषण ठवकर, मनोज श्रृंगारपवार, जितू हलमारे, धनू नंदनवार, पुडके, राहुल उदापुरे, नयन वंजारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते.
..