उद्धव ठाकरे यांनी रोज 'रामरक्षा' म्हणावी, त्यांचे भले होईल

    दिनांक :05-Jul-2026
Total Views |
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

चंद्रपूर :
CM Devendra Fadnavis उद्धव ठाकरे यांना श्री. राम आठवले, याचा मला आनंद आहे. ते श्री रामापासून दूर गेले होते म्हणून त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाली. मात्र त्यांनी केवळ आजच्या दिवसापुरते नव्हे, तर रोज 'रामरक्षा' म्हणावी. त्यांचे भले होईल, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यांनी दिला. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरणावरून उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, राज्यभरात आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला.
 
 
cm dsl
 
​चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे एका खाजगी धार्मिक कार्यक्रमासाठी ते रविवारी फडणवीस वाड्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना राम आठवले, याचा मला नक्कीच आनंद आहे. आमची अपेक्षा एवढीच होती की, त्यांना राम आठवले पाहिजेत. यापूर्वी त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. आता त्यांनी जर पुन्हा रामाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले असेल, तर त्यांचे नक्कीच भले होईल, असेही फडणवीस म्हणाले.