विकृत वडिलाने केली मुलीशी अश्लील वर्तन

    दिनांक :07-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर :
Obscene behavior towards a girl एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरुणीशी तिच्याच वडिलांनी कथितरीत्या अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
 
vinay
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आई-वडिलांमध्ये काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू असून, त्यानंतर तरुणी तिच्या वडिलांसोबत राहत होती. तक्रारीनुसार, ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास तरुणी घरात एकटी असताना आरोपी वडिलांनी तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिच्याशी अश्लील वर्तन केले आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.