अमरावतीत वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र होणार

आ. संजय खोडके यांच्या लक्षवेधीवर वनमंत्र्यांची घोषणा

    दिनांक :07-Jul-2026
Total Views |
अमरावती
mla sanjay khodke विभागातील पाचही जिल्ह्यांमधील वनक्षेत्रातील वन्यजीवांचे वाढते अपघात तसेच वन्यतस्करांमार्फत वन्यजीवांच्या जीवास धोका निर्माण झाल्याच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना करण्याबाबत आ. संजय खोडके यांनी विधिमंडळात लक्षवेधी लावून धरली होती. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील वनक्षेत्रामधील वन्यजीवांचे प्राण वाचवण्यासाठी व त्यांच्यावर वेळेत यशस्वी उपचार करून पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन येथे अत्याधुनिक समर्पित वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र विकसित करण्याबाबत शासन ठोस पाऊल उचलणार असल्याची घोषणा केली.

mla khodake 
 
 
mla sanjay khodke  आ. संजय खोडके सभागृहात म्हणाले, अमरावती हे अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांशी उत्कृष्ट रस्ते संपर्काने जोडले असल्याने अमरावती महसूल विभागासाठी अमरावती येथे वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अमरावती विभागातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प, काटेपूर्णा, कारंजा-सोहोळ, ज्ञानगंगा, पैनगंगा, लोणार, इसापूर, टिपेश्वर वन्यजीव अभयारण्ये तसेच पोहरा-मालखेड वनक्षेत्रातील वाढत्या वन्यजीव बचाव प्रकरणांच्या पृष्ठभूमीवर अमरावती येथे प्रादेशिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव आला आहे का? असल्यास उपाययोजना व कार्यवाही संदर्भात खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
mla sanjay khodke  त्यावर वनमंत्री नाईक यांनी सांगितले की, अमरावती विभागात वन्यजीवांच्या उपचार, उपाययोजना व पुनर्वसनबाबत कुठलीही सुविधा उपलब्ध नाही, हे खरे असले तरी या संदर्भात अमरावतीच्या बांबू गार्डन येथे समर्पित वन्यजीव बचाव, उपचार व पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे. याबाबत शासन सकारात्मक असून लवकरच केंद्राच्या उभारणीस शासन मान्यता व निधी देऊन कार्यवाही करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.