दाेन आरोपी ताब्यात, एक फरार
अमरावती,
Saving the lives of cattle शहर गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिस्मिल्ला नगरातून कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या ३७ गोवंशांना जीवदान दिले. या प्रकरणी २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एक फरार आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली.
गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, बिस्मिल्ला नगर येथील एका कोठ्यात कत्तलीसाठी व विक्रीसाठी काही गोवंश अमानुषपणे एकाच दोराला, चारा-पाणी न देता बांधून ठेवली आहेत. पथक घटनास्थळी गेले असता एका गोठ्यात लहान-मोठी अशी ३७ गोवंश जनावरे अमानुषपणे बांधून होती. लगेच मनपाचे पशु वैद्यकीय अधिकारी निलेश सोळंके व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी गोवंशाची तपासणी केली. बऱ्याच जनावरांना जखमा झाल्याचे दिसून आले. या गोठ्यात असलेल्या दोघांना जनावरांच्या मालकीबाबत विचारणा केली असता, त्यानी ही जनावरे अब्दुल अझहर, मोहम्मद शफी यांनी कत्तल व विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. गोठ्याची जागा सैयद अझहरच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी तीनपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, मोहम्मद फरार आहे. जप्त करण्यात आलेली गोवंश जनावरे देखभाल व संरक्षणासाठी गोरक्षण संस्थान, दस्तुरनगर येथे पाठविण्यात आली.