विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जाणे : तारेवरची कसरत

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
संबंधित विभागाचे दुर्लक्ष, लोकसहभागातून पुढाकाराची गरज

हदगाव, 
Students' problem तालुक्यातील बरडशेवाळा, पळसा, मनाठा, बामणी फाटा परिसरातील अनेक गावांसह खेडे-वस्त्यांमध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत असून, अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
 

STUDENT 
 
जुन्या ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय स्तरावर कारभार सुरू असला तरी ग्रामीण भागातील मूलभूत समस्यांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे गावोगावी निर्माण झालेल्या अडचणी सोडविण्यासाठी आता लोकसहभागातून पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बरडशेवाळा येथे पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असून गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस चौकी, शाळा तसेच महसूल मंडळ सुविधा उपलब्ध आहे. विद्यमान ग्रामपंचायतने कायमस्वरूपी ग्रामसेवक नसतानाही ज्या वस्त्यांमध्ये रस्त्यांची सुविधा नव्हती, त्या ठिकाणी विविध योजनांच्या निधीतून नवीन रस्त्यांची कामे केली.
 
 
मात्र गावातील काही भागांमध्ये आजही चिखलाचे रस्ते कायम आहेत. किरकोळ दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चिखलामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येठ नागरिक तसेच शेतकèयांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळेत जाणाèया विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. रस्त्यांची दुरुस्ती करून चिखलमुक्त व्यवस्था करावी, यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे अनेक वेळा मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे. पावसाळ्याचा विचार करून संबंधित विभागाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.