योग विद्याधाम तर्फे ४६ जणांचे रक्तदान

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Central Railway Colony योग विद्या गुरुकुल, नाशिक अंतर्गत योग विद्याधाम नागपूर शाखेचा स्थापना दिन व संस्थापक-अध्यक्ष योगाचार्य . मनोहर चारमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

rakt 
 
 
योग विद्या धाम नागपूर परिवार, सेंट्रल रेल्वे कॉलनी, वात्सल्य चाइल्ड वेल्फेअर फाउंडेशन, सेंट्रल इंडिया नवोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघटना तसेच योग परिचय वर्ग क्रमांक २१ यांच्या सहकार्याने आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर पार पडले. रक्तदात्यांना योगाचार्य श्री. मनोहर चारमोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण डहाके, योग भास्कर योजना प्रमुख डॉ. प्राजक्ता गद्देवार व सहकार्यवाह सौ. रमणी वाघाये यांनी नियोजन केले. संचालन सौ. सुनीता शिवणकर यांनी, तर आभार आशिष सालफळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:मिलिंद शिनखेडे,संपर्क मित्र