नागपूर,
Dharampeth Science College विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, नागपूर शाखेतर्फे युवा नेतृत्व विकसन उपक्रमांतर्गत धरमपेठ येथील म.पा.देव विज्ञान महाविद्यालयात ‘युवा नेतृत्व ओरिएंटेशन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.युवांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन व राष्ट्रनिर्मितीची भावना विकसित करण्यासाठी कथा, गीत, सादरीकरण, मैदानी खेळ आणि समूहचर्चेचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी प्राचार्य डॉ. पितांबर हुमणे यांच्या हस्ते ‘युवा नेतृत्व विकसन उपक्रम २०२६-२७’च्या पोस्टरचे लोकार्पण तसेच ‘सिंहनाद’ पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.
युवा प्रमुख आसावरी कुळकर्णी यांनी ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये अनंत क्षमता आहे’ या विचारातून युवकांना मार्गदर्शन केले. पृथा चौरीकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. निलीमा केतकर व अर्चना लपालकर यांनी मैदानी खेळ घेत नेतृत्व, संघभावना व सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र