indian contract act ॲड. साक्षी पाठक
प्रश्न: भारतीय करार कायदा, १८७२ म्हणजे काय?
उत्तर: भारतीय करार कायदा, १८७२ हा भारतातील करारांशी संबंधित मूलभूत कायदा आहे. कराराची निर्मिती, वैधता, अंमलबजावणी, उल्लंघन आणि करारातून निर्माण होणारे हक्क व दायित्वे याबाबत या कायद्यात तरतुदी आहेत.
प्रश्न: ‘करार’ म्हणजे काय?
उत्तर: भारतीय करार कायद्याच्या कलम २(ह) नुसार, कायद्याने अंमलात आणता येणारा करार म्हणजे करार होय.
प्रश्न: ॲग्रीमेंट आणि कॉट्रॅक्ट मध्ये काय फरक आहे?
उत्तर: प्रत्येक करार हा ॲग्रीमेंट असतो; परंतु प्रत्येकॲग्रीमेंट हा कॉंट्रॅक्ट नसतो. एखाद्या ॲग्रीमेंटला कायदेशीर अंमलबजावणीची क्षमता प्राप्त झाली की तो कॉंट्रॅक्ट बनतो.
प्रश्न: वैध कराराचे आवश्यक घटक कोणते?
उत्तर- प्रस्ताव व त्याची स्वीकृती, पक्षकारांची मुक्त संमती, सक्षम पक्षकार, कायदेशीर प्रतिफळ, कायदेशीर उद्देश, कराराची निश्चितता, कायद्याने स्पष्टपणे अवैध ठरवलेला नसणे, आवश्यक असल्यास कायदेशीर औपचारिकता पूर्ण करणे.
प्रश्न: प्रस्ताव म्हणजे काय?
उत्तर: एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी काही करण्याची किंवा न करण्याची तयारी व्यक्त केली, तर त्याला प्रस्ताव म्हणतात. याची व्याख्या कलम २(अ) मध्ये आहे.
प्रश्न: प्रस्तावाची स्वीकृती म्हणजे काय?
उत्तर: ज्याला प्रस्ताव करण्यात आला आहे, त्या व्यक्तीने प्रस्तावाला संपूर्ण आणि बिनशर्त संमती दिल्यास त्याला स्वीकृती म्हणतात. कलम २(ब) मध्ये याची तरतूद आहे.
प्रश्न: प्रतिफळ (Consideration) म्हणजे काय?
उत्तर: करारातील एका पक्षाच्या वचनाच्या बदल्यात दुसऱ्या पक्षाकडून केलेली कृती, न केलेली कृती किंवा करण्याचे किंवा न करण्याचे वचन म्हणजे प्रतिफळ. कलम २(ड) मध्ये त्याची व्याख्या आहे.
प्रश्न: ‘नो कंन्सीड्रेशन, नो कॉंट्रॅक्ट’ या तत्त्वाचा अर्थ काय?
उत्तर: सामान्यतः प्रतिफळाशिवाय केलेला ॲग्रीमेंट हा करार म्हणून अंमलात आणता येत नाही. मात्र भारतीय करार कायद्याच्या कलम २५ मध्ये काही अपवाद दिले आहेत, जसे नैसर्गिक प्रेम व आपुलकीवर आधारित विशिष्ट लेखी व नोंदणीकृत करार.
प्रश्न: करार करण्यास सक्षम व्यक्ती कोण?
उत्तर: कलम ११ नुसार, करार करण्यासाठी व्यक्ती प्रौढ, कायद्याने करार करण्यास अपात्र नसलेली असावी.
प्रश्न: ‘फ्री कंन्सेंट’ म्हणजे काय?
उत्तर: कलम १४ नुसार, संमती ही जबरदस्ती, अनुचित प्रभाव, फसवणूक, चुकीचे प्रतिपादन किंवा चूक यांमुळे निर्माण झालेली नसल्यास ती मुक्त संमती मानली जाते.
प्रश्न: कोईरशन म्हणजे काय?
उत्तर: कलम १५ नुसार, एखाद्या व्यक्तीला करार करण्यास भाग पाडण्यासाठी भारतीय दंडात्मक कायद्याने निषिद्ध कृती करण्याची किंवा करण्याची धमकी देणे किंवा मालमत्ता बेकायदेशीरपणे रोखून ठेवणे/रोखून ठेवण्याची धमकी देणे म्हणजे कोईरशन होय.
१२. प्रश्न: ‘अनड्यू इन्फ्लुअन्स’ म्हणजे काय?
उत्तर: कलम १६ नुसार, एका पक्षाची दुसऱ्या पक्षावर असलेली प्रभावी स्थिती वापरून अनुचित फायदा मिळवण्यासाठी करार करवून घेतला, तर त्याला ‘अनड्यू इन्फ्लुअन्स’ म्हणतात.indian contract act उदाहरणार्थ, पालक आणि अवलंबून असलेले मूल किंवा विश्वासाच्या नात्यातील व्यक्तींमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
प्रश्न: फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन मध्ये काय फरक आहे?
उत्तर: फ्रॉड मध्ये व्यक्तीला फसवण्याचा हेतू असतो, तर मिसरिप्रेझेंटेशनमध्ये चुकीचे प्रतिपादन केले जाते; परंतु फसवण्याचा हेतू असणे आवश्यक नाही. दोन्ही परिस्थितींमध्ये प्रभावित पक्षाला करार रद्द करण्याचा अधिकार मिळू शकतो, कायद्यातील अटींनुसार.
प्रश्न: ‘व्हॉईड ॲग्रीमेंट’ म्हणजे काय?
उत्तर: कलम २(ग) नुसार, ज्याचा कायद्याने अंमल करता येत नाही असा ॲग्रीमेंट म्हणजे व्हॉईड ॲग्रीमेंट होय.
प्रश्न: ‘व्हॉईडेबल कॉंट्रॅक्ट’ म्हणजे काय?
उत्तर: कलम २(इ) नुसार, एका किंवा अधिक पक्षांच्या इच्छेनुसार कायद्याने अंमलात आणता येणारा, परंतु दुसऱ्या पक्षाच्या इच्छेनुसार अंमलात आणता न येणारा करार म्हणजे ‘व्हॉईडेबल कॉंट्रॅक्ट’ होय.
प्रश्न: ‘Contingent Contract’ म्हणजे काय?
उत्तर: कलम ३१ नुसार, एखाद्या collateral घटना घडण्यावर किंवा न घडण्यावर कराराची अंमलबजावणी अवलंबून असेल, तर तो Contingent Contract म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट घटनेवर विम्याची रक्कम देण्याचे वचन.
प्रश्न: कराराचा भंग म्हणजे काय?
उत्तर: करारातील एखाद्या पक्षाने आपले वचन पूर्ण करण्यास नकार दिला किंवा करारानुसार आपली जबाबदारी पूर्ण केली नाही, तर त्याला कराराचा भंग म्हणतात.
प्रश्न: कराराचा भंग झाल्यास नुकसानभरपाई कोणत्या कलमानुसार मिळते?
उत्तर: कलम ७३ मध्ये कराराचा भंग झाल्यास नुकसानभरपाईबाबत तरतूद आहे. भंगामुळे नैसर्गिकरित्या निर्माण झालेले किंवा करार करताना पक्षकारांच्या अपेक्षेत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानभरपाई मिळू शकते.
प्रश्न: कराराची समाप्ती म्हणजे काय?
उत्तर: करारातील पक्षकारांची करारातून निर्माण झालेली कर्तव्ये संपुष्टात येणे म्हणजे कराराची समाप्ती. कराराची पूर्ण अंमलबजावणी, परस्पर संमती, कराराचा भंग, अशक्यता किंवा कायद्याच्या परिणामामुळे करार समाप्त होऊ शकतो.