लाडकीच्या खात्यात 3000 जमा होणार का?

    दिनांक :10-Aug-2026
Total Views |
मुंबई
ladki bahin yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हा निधी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केला जातो. मात्र, ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झालेली नाही. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाकडून योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाभातून वगळण्यात येत आहे. अर्जांची छाननी करण्यासाठी आयकर विभागाचीही मदत घेतली जात आहे.
 

yuk  
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून सुरुवातीपासूनच काही नियम आणि अटी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी अर्ज दाखल केले आणि त्यापैकी अनेक अर्ज पात्रही ठरवण्यात आले. त्यानंतर योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया लागू करण्यात आली. या प्रक्रियेनंतर तब्बल 80 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने या महिलांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही.
दरम्यान, जुलै महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. या बैठकीत लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी थेट हस्तांतरित करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी जून महिन्याचा ladki bahin yojana हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, जर 18 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही, तर रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया लागू केली. त्यानंतर कागदपत्रांची छाननी करताना सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. त्यामुळे जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारच्या निर्णयाची लाभार्थी महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.