नागपूर,
Women's College, Nandanvan महिला महाविद्यालय, नंदनवन येथे ॲक्युप्रेशर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ४८ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. श्री साई समर्थ एज्युकेशनल, मेडिकल अँड रिसर्च सोसायटी व पराग कुळकर्णी ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट फॅमिली यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, तर विशेष अतिथी म्हणून आरटीएम नागपूर विद्यापीठाच्या लाइफलाँग लर्निंग विभागाचे प्रमुख डॉ. समीत माहोरे उपस्थित होते. कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी, स्वावलंबन आणि समाजसेवेची दारे खुली होतात, असे मान्यवरांनी सांगितले. पराग कुळकर्णी यांनी ॲक्युप्रेशर क्षेत्रातील अनुभव सांगून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम विकसित करण्याचा मानस व्यक्त केला. सारिका कुळकर्णी यांनी २०२१ पासून सात बॅच पूर्ण झाल्या असून सुमारे २३० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी आयोजन समिती व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:तेजस जोशी,संपर्क मित्र