हर घर तिरंगा’ अभियानात रांगोळी व महारॅली

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर,(पारशिवनी)
Tricolor every house, ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत हरिहर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नगरपंचायत, पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रांगोळी स्पर्धा व महारॅलीचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी देशभक्ती, तंत्रज्ञान, पर्यावरण आदी विषयांवर आकर्षक रांगोळ्या काढून राष्ट्रभावना व्यक्त केली. ‘हर घर तिरंगा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी पारशिवनी नगरी दुमदुमली. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

raly 
 
 
महारॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपनगराध्यक्ष दीपक शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. रॅलीचे संचालन प्रा. ताराचंद चव्हाण यांनी केले. नगरपंचायतीचे निखिल ढोले यांनी आभार मानले. कार्यक्रमात अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सौजन्य: प्रा. ताराचंद चव्हाण,संपर्क मित्र