नागपूर ,
Jyotiba Vidyalaya महाज्योती संस्थेच्या वतीने ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मुलींसाठी आत्मरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जयदुर्गा एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा मानेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या अरुणा कडू यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सलोनी यांनी विद्यार्थिनींना कराटे व योगाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे संचालन सौ. मेंढेकर यांनी केले. शिबिराच्या आयोजनासाठी श्री. निनावे यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: प्राचार्या अरुणा कडू,संपर्क मित्र