क्रांतिकारकांच्या प्रदर्शनातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा

    दिनांक :17-Aug-2026
Total Views |
नागपूर ,
Vinayakrao Deshmukh High School लकडगंज येथील विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व स्वातंत्र्यसैनिकांविषयी आदरभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने क्रांतिकारकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. क्रांतिकारकांच्या इतिहासाचे अभ्यासक वीरेंद्र देशपांडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
 

smita 
 
 
प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांच्यासह अनेक क्रांतिकारकांची दुर्मिळ छायाचित्रे व माहिती मांडण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्रांतिकारकांच्या जीवनकार्याची माहिती जाणून घेतली.मुख्याध्यापिका अनुश्री पारखी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला भाग्यश्री करजगावकर व स्मिता देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम व सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले.
सौजन्य:स्मिता देशमुख, संपर्क मित्र