पोदार प्रेपमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

    दिनांक :18-Aug-2026
Total Views |
नागपूर,
podar-prep-school जगन्नाथ नगर येथील पोदार प्रेप २ मध्ये ‘स्वातंत्र्य घडवते भविष्य, शहाणपण दाखवते वाट’ या संकल्पनेवर आधारित स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि आजी-आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग होतातीन पिढ्यांना एकत्र आणणाऱ्या या कार्यक्रमात पिढ्यांमधील नाते दृढ करण्यासोबतच मुलांमध्ये देशप्रेम, राष्ट्राबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना रुजविण्यात आली.
 
 

gal 
 
विविध देशभक्तिपर उपक्रम, सांघिक खेळ, कुटुंबीयांसाठी आव्हाने तसेच आजी-आजोबांचे अनुभव कथन यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.मुलांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत सहभाग घेत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव करून दिली. ‘भविष्य एकत्र घडवूया’ या उपक्रमातून एकता, जबाबदारी, संघभावना आणि सहकार्याचा संदेश देण्यात आला.हा कार्यक्रम डॉ. स्वाती पोपट वत्स, संस्थापक संचालक, पोदार प्रेप आणि मोना सिंग, मुख्याध्यापिका, पोदार प्रेप २ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झाला.
सौजन्य:सोनाली गलघाटे ,संपर्क मित्र