स्वातंत्र्यदिनाचा ‘जल्लोष’ गीत-कवितांतून रंगला

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
ManManthan santhya मन मंथन साहित्यिक व सांस्कृतिक संस्था, नागपूरच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ व १६ ऑगस्ट रोजी ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुगल मीटच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात देशभक्तीपर हिंदी व मराठी गीतांसह कवितांचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिषाचार्य वंदना पांडे होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्रा. डॉ. सतीश शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना संस्थापिका व आयोजक . प्रेरणा वाडी आणि सचिव. मंजुषा विश्वेकर यांची होती. संयोजन कार्यक्रमप्रमुख डॉ. नंदिनी खाडे यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन मेधा घोंगे यांनी केले. . शुभांगी तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले,
 
 
manthan
 
 
 
 
अध्यक्षीय भाषणात वंदना पांडे यांनी देशात शांतता नांदावी आणि समाजात फूट पडू नये, असे आवाहन केले. डॉ. सतीश शिरसाठ यांनी  एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थापिका प्रेरणा वाडी यांनी संस्थेच्या उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात रेवती बडगे, सुनीता फडणीस, मंजुषा विश्वेकर, रश्मी कुळकर्णी, डॉ. नंदिनी खाडे, अलका टिकेकर, मेधा घोंगे, मीरा घोंगे, अर्चना सिंगलवाऱ, प्रीती दीक्षित, पल्लवी पांडे, शुभांगी तिवारी, रश्मी धर्माधिकारी, साधना कपाळे, सुश्मिता गाडगीळ, संजय गडकरी, स्वाती मोदी, अस्मिता इनामदार, अलका बुरले, रेखा पिंगळे, प्रतिमा तुंगार, शुभदा साधू, वैशाली चांदेकर, अनिता धर्माधिकारी, वृंदा भागडीकर, रामदास गायधने, शरयू कुलकर्णी, नीलिमा जोशी, स्नेहा गाडे, अबोली देवगावकर, प्रेरणा वाडी तसेच अर्णव कुलकर्णी, अनय पांडे, अनघा जोग, अदिती जोग, प्रथमेश दीक्षित आदींनी सहभाग घेतला.
सौजन्य:रितिका काशीमकर,संपर्क मित्र