नागपूर,
eye camp at nari त्रिशरण बुद्ध विहार, नारी येथे ज्ञानोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्था, सुगत नगर यांच्या वतीने दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी १०० हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू नागरिकांना संस्थेतर्फे मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
ज्ञानोदय बहुउद्देशीय जनकल्याण संस्था स्वखर्चाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविते. यामध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, संगणक प्रशिक्षण, रोजगार मेळावे आदी उपक्रमांचा समावेश आहे. या शिबिराच्या आयोजनासाठी संस्थेचे राहुल वासनिक, सुनील वाघ, मनोहर डोंगरे, कमलेश कोटावार आणि मनोज साने यांचे योगदान लाभले.
सौजन्य: सुनिल वाघ, संपर्क मित्र