निवृत्तीला विराम, प्रबोधनाला नाही!

    दिनांक :20-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Vandana Vankar वंदना वनकर (नासरे) यांच्या शिक्षकी सेवेला निवृत्ती मिळाली असली, तरी त्यांच्यातील सामाजिक शिक्षिका मात्र आजही थांबलेली नाही. त्यांच्या चाहत्यांनी सेवापूर्ती सोहळ्याचे निमित्त साधत प्रबोधनाचा अनोखा सोहळा घडवून आणला.
 

rs 
 
 
आजच्या शिक्षणपद्धतीपासून समाजशिक्षणाची दूरदृष्टी कशी विकसित करता येईल, यावर ई. झेड. खोब्रागडे, धनराज वंजारी, ज्ञानेश्वर रक्षक, वैशाली डोळस, उमेश कोराम, प्रा. अभिलाष नखाते आणि स्वतः वंदना वनकर यांनी केलेले अभ्यासपूर्ण चिंतन उपस्थितांना विचार करायला लावणारे ठरले.सेवापूर्तीच्या निमित्ताने झालेली ही चिंतनशील मेजवानी उपस्थितांना आनंदासोबतच आत्मपरीक्षणाची जाणीव देऊन गेली. जीवनातील वेळ आणि अनुभवाचे सार्थक झाल्याची अनुभूती या सोहळ्यात सर्वांना आली.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र