प्रतिकात्मक तिरडी घेऊन देऊळघाटचे नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
बुलढाणा
residents-march देऊळघाट येथील चर्मकार समाजाच्या पूर्वजांच्या स्मशानभूमीवर झालेल्या अतिक्रमाणाविरोधात आणि प्रशासनाच्या संवेदना जाग्या करण्यासाठी दि. ९ सप्टेंबर रोजी दुपारी नागरिकांनी हातात प्रतिकात्मक तिरडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.
 
march
तालुयातील देऊळपाट येथील जिल्हा परिषद हायस्कूलसमोरील शासकीय जमीन आणि त्याला लागून असलेली चर्मकार समाजाची पारंपरिक स्मशानभूमी ही अनेक वर्षांपासून नागरिकांच्या आलीचा केंद्रबिंदू आहे. भूमाफियांनी बोजारचा गट क्रमांक ३१८ विकत घेऊन, शासकीय जमिनीसह स्मशानभूमीच्या जागेवर लोखंडी अँगल काटेरी ताराचे कुंपण घातले.
 
कोट्यवधीची ही जागा दिवसाढवळ्या बळकावून गरिबांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण झाल्याचे समजताच चर्मकार समाजबांधवांनी अर्जवविनवण्या केल्या प्रशासनाचे दरवाजे ठोठावले परंतु तहसीलदारांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने न्याय मिळत नसल्याने हताश झालेल्या नागरिकांनी बुलढाण्यात आमरण उपोषण सरु केले केले ९ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासन विरोधात प्रतिकात्मक तिरडी आंदोलन छेडले आहे.