धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चा

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नागपूर,
dharampeth arts and commerce college धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथे प्राध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपस्थित राहून प्राध्यापकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० विषयावरील चर्चासत्राच्या पुस्तकाची भेट देऊन स्वागत करण्यात आले.
 
dharampeth arts and commerce college
 
बैठकीदरम्यान उपस्थित प्राध्यापकांशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंचच्या डॉ. कल्पना पांडे आणि डॉ. सतीश चाफले यांनी ‘शिक्षण मंच सदस्य अभियान’ याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. या बैठकीला प्राचार्या डॉ. मंजुश्री सरदेशपांडे, डॉ. विवेक दिवाण, डॉ. श्रीनिवास मानेकर, डॉ. मंगेश पाठक यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: चंद्रशेखर क्षीरसागर, संपर्क मित्र