बुलढाणा
mla-sanjay-gaikwad गावातील पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा तसेच गावाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे. पाणी ही प्रत्येक कुटुंबाची मूलभूत गरज असून, ‘हर घर जल’ या संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध व नियमित पाणी पोहोचविण्याच्या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत विविध पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगितले.
मढ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले यावेळी नळ योजनेचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत पूजन करून पाणीपुरवठा योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेमुळे मढ येथील ग्रामस्थांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून विशेषत महिला भगिनींची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे.
लोकार्पण सोहळ्यापूर्वी आ. संजय गायकवाड यांनी मढ येथील उत्स्फूर्त रॅली काढण्यात आली. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता घुसळकर साहेब, सहाय्यक अभियंता शुभम बारोटे, तालुका संपर्कप्रमुख अर्जुन दांडगे, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, गजानन लांडे पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजा सावळे, सरपंच अंजना केदारे, संग्राम बालोद, सुभाष दळवी, रतन नरोटे, दादाराव महाले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.