ट्रॅव्हल्सखाली चिरडल्याने मायलेक गंभीर जखमी

लकडगंज पोलिसांची आरेरावी

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur accident खासगी बसने (ट्रॅव्हल्स) रस्त्याने जात असलेल्या दुचाकीस्वार महिलेसह तिच्या तीन वर्षांच्या मुलाला जोरदार धडक देत चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. अपघात घडल्याचे दिसत असतानाही बस चालकाने बस न थांबवता खाली कोसळलेल्या महिलेला जवळपास १५ ते २० फुट दूरपर्यंत फरफटत नेले. ही घटना आज दुपारी गंगाबाई घाट परिसरात घडली. दामिनी उथरा (३२) असे आईचे आणि वृषभ उथरा (३) असे गंभीर जखमी चिमुकल्याचे नाव आहे. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेसह चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांपैकी मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून महिलेच्या हाताचे हाड मोडले आहे. दोघांवरही सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
 

nagpur accident woman and 3-year-old son seriously injured after being hit by private bus 
नंदनवन पोलिस हद्दीतील गंगाबाई घाट रोडवरील मां वैष्णोदेवी चौकाजवळ दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. दामिनी उथरा या आपल्या मुलाला घेऊन दुचाकीने जात होत्या. संजय ट्रॅव्हल्स या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनीची बस पारडीकडून घाटरोडच्या दिशेने जात होती. अपघात घडल्याच्या काही सेकंदापूर्वी ही बस सिग्नलवर थांबलेली होती. हिरवा दिवा लागताच बस सुरू झाली. दारम्यान, दामिनी यांच्या दुचाकीला बसने धडक दिली. महिलेची दुचाकी बसला अडकल्यानंतर काही अंतर फरफटत गेली. एका युवकाच्या प्रकार लक्षात आल्यानंतर बसचालकाने बस थांबवली. या अपघातात आई आणि चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली. बराच वेळ पोलिस घटनास्थळावर पोहचले नाहीत. बस चालकाने नागरिकांना अरेरावीची भाषा केली. बसच्या आतील सीसीटीव्हीत संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.
लकडगंज पोलिसांची अरेरावी
लकडगंज वाहतूक परिमंडळामध्ये पोलिस निरीक्षकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वसुलीचा खेळ चालत असल्यामुळे अनेक वाहतूक पोलिस कर्मचारी चौकात न थांबत नाहीत, असा आरोप आहे. आज झालेल्या अपघातानंतर पोलिस कर्मचारी अमोल मेश्राम आणि दौलत राऊत यांनी अपघातात मदत करणाऱ्या निलेश नावाच्या युवकाशी अरेरावी केली. पोलिस निरीक्षकाच्या पाठबळामुळे कर्मचारीसुद्धा अरेरावी करीत होते, असा आरोप त्या युवकाने केला आहे.