भरधाव दुचाकीसह विद्यार्थी उड्डाणपुलावरून खाली पडला

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur news सक्करदरा उड्डाणपुलावरून दुचाकीसह खाली पडून गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रजीत भीमराव वाहने असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विचित्र अपघात गुरुवारी सकाळी घडला. प्राथमिक माहितीनुसार, प्रजीत वाहणे हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तो दुचाकीने सक्करदरा उड्डाणपुलावरून जात होता.

nagpur news
अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीसह तो उड्डाणपुलावरून खाली कोसळला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी प्रजीतला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात दुचाकीचा वेग अधिक असल्याने प्रजीतचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्यास सुरुवात केली असून, पुढील तपास सुरू आहे.