अनिल कांबळे
नागपूर,
obscene photos of a husband and wife जरीपटका परिसरातील एका पती-पत्नीची खासगी आणि अश्लील छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्तीने फेसबुकवर छायाचित्रे प्रसारित करण्यासोबतच त्यासोबत आक्षेपार्ह संदेशही लिहिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पती-पत्नीच्या ओळखीचा आहे. त्यांच्यात पूर्वी कौटुंबिक संबंध होते. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात त्या युवकाने पती- पत्नीची खासगी छायाचित्रे फेसबुकवर प्रसारित केली. त्यासोबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने दाम्पत्याची नातेवाईक आणि परिचितांमध्ये बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामागे वैयक्तिक वैमनस्य असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी सायबर पथकाची मदत घेतली जात असून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरू आहे.