रामनगरात तान्हा पोळा उत्साहात

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Ramnagar Ganeshotsav Cultural Mandal रामनगर गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी दीडशेहून अधिक बालक-बालिका सजविलेले लाकडी बैल घेऊन तसेच विविध आकर्षक वेशभूषा करून पालकांसह सहभागी झाले.
 

tanha 
 
 
 
सप्तशृंगी माता, लक्ष्मी, बालकराम, गोपाळकृष्ण, हनुमान, भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, जवान, डॉक्टर, अंतराळवीर, वकील, शेतकरी आदी वेशभूषांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक संस्कृतीसोबतच विविध क्षेत्रांची ओळख करून देणाऱ्या या वेशभूषांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
                                                                                                               सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र 
 
ओम शिव साई नगरीत तान्हा पोळा उत्साहात
बेसा :
Ramnagar Ganeshotsav Cultural Mandal ओम शिव साई नगरी महिला मंडळाच्या वतीने तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बालगोपालांनी सजविलेले लाकडी बैल घेऊन मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी उत्कृष्ट वेशभूषा व बैल सजावट स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या बालकांना प्रमुख पाहुण्या सुनिता जिचकार व प्रांजली तालहन यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. 
 
 
50
 
 
सौजन्य:राजेंद्र दिवारे,संपर्क मित्र 
तान्हापोळ्यातून कृषिसंस्कृतीची ओळख
दिघोरी,
 Ramnagar Ganeshotsav Cultural Mandal गोन्हीसिम, साईनगर, दिघोरी नाका येथे तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नंदीबैल सजावट व बालकांच्या वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.नंदीबैल सजावटीत मनप्रीत सोमकुवर प्रथम, अंशू बावणे द्वितीय तर दिव्यांश वैद्य तृतीय ठरले. वेशभूषेत सिया वाखतकर प्रथम, नितारा कुरुडकर द्वितीय तर मैत्री गवळी तृतीय आली. विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.प्रमुख अतिथी कवी प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’ यांनी तान्हापोळ्याच्या माध्यमातून बालकांना शेतकरी, बैलजोडी आणि कृषिसंस्कृतीच्या योगदानाची ओळख होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी महादेव बावणे होते. 
 
 
 
१ २
 
 
 
सौजन्य :निकिता गावंडे,संपर्क मित्र