अवैध जुगार अड्ड्यावर धाड:१५ जुगाऱ्यांवर कारवाई

खदान पोलिसांची कारवाई: २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :18-Sep-2026
Total Views |
अकोला
akola gambling raid ऑपरेशन प्रहार अंतर्गत खदान पोलिस ठाण्याच्या पथकाने गुरुवार, १७ रोजी येवता रोड मार्गावरील एका हॉटेलवमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करून १५ जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.आरोपी कडुन ९ वाहणे, ८ मोबाईल, रोख रक्कम असा एकुण २७ लाख ६२ हजार ८१० रूपये चा मुद्देमाल हस्तगत केला. पाच फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.
 

akola gambling raid: 15 booked, property worth rs 27.62 lakh seized 
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्लासमेट हॉटेल व बार येवता रोड मलकापुर येथे अवैद्य जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता कारवाई दरम्यान आरोपी कुणाल सुनिलकुमार मनवानी वय २६ वर्षे रा. सिंधी कॅम्प, कुशल विमलकुमार कावना वय २१ वर्ष, रा. पक्की खोली सिंधी कॅम्प, जतीन सुनिलकुमार मनवानी वय १९ वर्ष रा. कच्ची खोली सिंधी कॅम्प, दिपक परमानंद सिदारा वय ४१ वर्षे आदर्श कॉलनी, निशांत मेघराज बजाज वय २४ वर्षे रा. आदर्श कॉलनी, राहुल दौलत चौथानी वय २५ वर्षे रा पक्की खोली सिंधी कॅम्प, आशीष चंदुलाल जसवानी वय २८ वर्षे, रा. कच्ची खोली सिंधी कॅम्प, रोशन अनिलकुमार राजपाल, वय २४ वर्षे, धंदा कोल्ड्रींग दुकान, रा. पक्की खोली सिंधी कॅम्प, वंश महेशकुमार टकरानी वय १७ वर्षे रा.नानकनगर निमवाडी सिंधी कॅम्प अटक करण्यात आली. तसेच फरार आरोपी सुमीत गुरबानी, पवन चेनानी, कौशीक प्रकाश शोधनानी, अमित बालचंदानी, जितेंद्र कमलकुमार खबरानी, विजय अहुजा सर्व रा.सिधी कॅम्प अकोला यांच्यावर कायदेशिर करण्यात आली असून पुढील तपास खदान पोलीस करीत आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रशेखर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर सुदर्शन पाटील यांचे मार्गदशनाखाली खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक भाऊराव घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक दिपक पवित्रकार, हेड कॉन्स्टेबल निलेश खंडारे, भुषण मोरे, गिरीष विर, प्रविण डोंगरे,अभिमन्यु सदांशिव, शिवम दुबे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश खेडकर, वैभव कस्तुरे, आकाश कठाने यांनी कारवाई केली.