अकोला
akola police action पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रहार अंतर्गत अमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या अनुषंगाने गुरुवार, १७ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने शहरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या इसमांविरुद्ध धडक कारवाई मोहीम राबविली.या कारवाई दरम्यान पोलीस स्टेशन अकोट फाईल, जुने शहर, कोतवाली व रामदासपेठ यांच्या हद्दीत ८ इसमांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये चेतन संदीप शिंदे, वय २२ वर्षे, रा. देशमुख फेल, जमीरोद्दीन कामरोद्दीन, वय २४ वर्षे, रा. मर्गटजवळ, मोहतामिल, शैलेश मधुकर धांडे, वय ४३ वर्षे, रा. महाकाली नगर, हरिहरपेठ, शंकर विजय लाखे, वय २१ वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर नगर, जुने शहर,अब्दुल समद अब्दुल लतीफ, वय ६० वर्षे, रा. कादरीपुरा, अकोट फाईल, शिवाजी पार्कजवळ, शेषराव रमेश वारोकार, वय ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, वाडेगाव, ता. बाळापूर, शिवशंकर अरुण सोनटक्के, वय ४० वर्षे, रा. धोतर्डी, शेख अफसर शेख अहमद, वय ३८ वर्षे, रा. अशोक नगर, अकोट फाईल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.अमली पदार्थांविरुद्ध मोहीम यापुढेही सुरू राहणार अकोला शहर व जिल्ह्यात अमली पदार्थांचे सेवन, विक्री व तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.