आर. माधवनच्या ‘GDN’ची नेटफ्लिक्सवर दुसऱ्या आठवड्यात मोठी झेप

जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर

    दिनांक :19-Sep-2026
Total Views |
मुंबई
r madhavan डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे यश अनेकदा पहिल्याच वीकेंडमध्ये ठरते. मात्र, अभिनेता आर. माधवनच्या ‘GDN’ने या समीकरणाला छेद देत स्ट्रीमिंग विश्वात दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. दिग्गज भारतीय संशोधक जी. डी. नायडू यांच्या असामान्य जीवनावर आधारित या बायोग्राफिकल ड्रामाने नेटफ्लिक्सच्या जागतिक व्ह्यूइंग चार्टमध्ये दुसऱ्या आठवड्यात लक्षणीय झेप घेतली आहे.
 

r madhavan gdn makes global impact, ranks 6th among netflix non-english films 
नेटफ्लिक्सच्या ७ ते १३ सप्टेंबर या कालावधीतील अधिकृत जागतिक व्ह्यूइंग आकडेवारीनुसार, ‘GDN’ने नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या श्रेणीत जगभरात सहावे स्थान मिळवले आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २.२ दशलक्ष व्ह्यूज नोंदवत एकूण ५.३ दशलक्ष तासांचे वॉच टाइम मिळवले आहे.
विशेष म्हणजे, पहिल्या आठवड्यातही चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. त्या कालावधीत ‘GDN’ला ०.९ दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते आणि प्रेक्षकांनी तब्बल २.२ दशलक्ष तास चित्रपट पाहिला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात व्ह्यूज आणि पाहणीच्या तासांमध्ये झालेली वाढ चित्रपटाला मिळत असलेल्या सातत्यपूर्ण प्रतिसादाचे संकेत देत आहे.
देशांतर्गत स्तरावरही ‘GDN’ची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. भारतातील नेटफ्लिक्सच्या नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र, त्याचा प्रभाव केवळ भारतीय प्रेक्षकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. मध्य पूर्वेसह विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही चित्रपटाने टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘GDN’ तिसऱ्या, कतारमध्ये सातव्या, तर बहरीनमध्ये आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आशिया आणि इतर बाजारपेठांमध्येही चित्रपटाची कामगिरी कायम असून, पाकिस्तानमध्ये त्याने चौथे आणि सिंगापूरमध्ये सातवे स्थान मिळवले आहे. त्यामुळे जी. डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित ही कथा भारतीय सीमांपलीकडेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.आर. माधवन यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीनेही ‘GDN’ हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीदरम्यान सहजपणे वावरणारा अभिनेता म्हणून माधवन यांनी यापूर्वीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘GDN’च्या माध्यमातून जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारा कलाकार म्हणून त्यांची प्रतिमा आणखी दृढ होताना दिसत आहे.यापूर्वी ‘Rocketry: The Nambi Effect’ या बायोग्राफिकल चित्रपटातून माधवन यांनी तुलनेने कमी परिचित असलेल्या एका भारतीय वैज्ञानिकाची कथा मोठ्या पडद्यावर मांडली होती. त्याच धाटणीने ‘GDN’मध्येही एका असामान्य व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास मानवी भावनांशी जोडत सादर करण्यात आला आहे. वास्तविक जीवनातील गुंतागुंतीच्या आणि तुलनेने अपरिचित कथा प्रभावी सिनेमॅटिक अनुभवात रूपांतरित करण्याची माधवन यांची क्षमता या चित्रपटातून पुन्हा अधोरेखित होत असल्याचे दिसते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘GDN’ला दुसऱ्या आठवड्यात मिळालेली ही वाढ केवळ सुरुवातीच्या चाहत्यांच्या उत्सुकतेपुरती मर्यादित नसल्याचे संकेत देते. चित्रपटाची चर्चा देशाबाहेरही होत असून, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधून निर्माण होणाऱ्या ‘वर्ड ऑफ माउथ’मुळे त्याच्या स्ट्रीमिंग कामगिरीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पहिल्या वीकेंडनंतरही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता टिकवून ठेवणारा ‘GDN’ सध्या नेटफ्लिक्सवरील भारतीय चित्रपटांमध्ये विशेष