अकोला,
maharashtra drought 2026शासनाकडून कोणतीही दुष्काळी तालुक्याची यादी अद्यापर्यंत जाहीर झाली नसतांना दुष्काळी तालुक्याची यादी काही माध्यमांवर प्रसारित झाली आहे.त्यामुळे ही यादी करणाऱ्याची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिले. ते डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील डॉ. के.आर .ठाकरे सभागृहात रविवार, २० रोजी पिक परिस्थिती संदर्भात अमरावती विभागीय आढावा बैठकी दरम्यान बोलत होते.

गत आठवड्यात बुलढाणा व राज्यातील इतर काही जिल्ह्यात दुष्काळ तालुक्याची यादी जाहीर झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.व लोकप्रतिनिधींना देखील मनस्ताप सहन करावा लागला.या पृष्ठभूमीवर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कृषिमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी केली.त्यावर कृषीमंत्री यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित बातमी प्रसारित करणाऱ्यांवर चौकशी करून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट केले.याशिवाय सर्वच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन ही यादी खोटी आहे.यासंदर्भात स्पष्ट करावे असे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले.