अहिर यादव समाजाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव!

आज समारोपाचा कार्यक्रम

    दिनांक :05-Sep-2026
Total Views |

GH67868
 
 
नागपूर,
Janmashtami of Ahir Yadav Community अहिर यादव समाज जिल्हा नागपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा उद्या, ६ सप्टेंबर रोजी समारोप होणार आहे. ४ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उत्सवात समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, सामाजिक एकतेचा संदेश देत हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.उत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणांहून भगवान श्रीकृष्णाची स्थापना करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी भव्य आरती कार्यक्रम पार पडला. आता ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे. या उत्सवाच्या माध्यमातून समाजातील बांधवांना एकत्र आणत सामाजिक एकतेला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्याच्या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अहिर यादव समाज जिल्हा नागपूरच्या वतीने करण्यात आले आहे.