गडचिरोली

भरधाव कारने पोलीस शिपायाला चिरडले

गडचिरोली, आरमोरी-गडचिरोली मुख्य रस्त्यावर गस्तीवर असताना एका भरधाव कारने पोलीस शिपायाला चिरडण्याची संतापजनक घटना शनिवारी (१६ मार्च) रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली.   या अपघातात केवलराम हिरामण एलोरे यांचा मृत्यू झाला. रात्र गस्तीवर असताना त्यांना नागपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ३३ ८८८ क्रमांकाची स्विफ्ट डीजायर कार दिसली, त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयन्त केला. गाडीचा वेग अधिक असल्याने गाडीचालकाने तो कमी न करता एलोरे यांना टाळून समोर जाण्याचा प्रयन्त केला. मात्र, एलोरे हे ..

मुख्यमंत्री ग्राम परीवर्तकावर ॲसिड हल्ला

गडचिरोली,मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतचे ग्रामपरिवर्तक समाधान कस्तुरे  यांच्यावर गुरुवारी (१४ मार्च) मध्यरात्री अज्ञात इसमांनी ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     तालुक्यातील लगाम ग्रामपंचायत कार्यालयात परिवर्तक म्हणून कार्यरत समाधान कस्तुरे हे आपल्या खोलीत झोपेत असताना गुरुवारी मध्यरात्री अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचा ..

नक्षलांकडुन वाहनांची जाळपोळ

गडचिरोली,एटापल्ली, तालुक्यापासुन जवळपास २५ किमी अंतरावर असलेल्या पुस्के येथे १२ मार्च रोजी मध्यरात्री नक्षलांनी चार जानडीअर वाहने जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. सदर गावात मागील काही दिवसापासुन रस्त्याचे बांधकाम सुरु होते. तसेच दोन दिवसापूर्वी याच गावात एका रोडरोलर ला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केला गेला.    प्राप्त माहितीनुसार काल मध्य रात्री १२ ते १५ नक्षली गावात दाखल झाले व सुरु असलेल्या कामाचा विरोध करत त्यांना कामावर लागलेल्या ४ वाहनांची जाळपोळ केली. सदर ..

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून शिक्षकाची हत्या

नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणगडचिरोली,जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना रविवारी (१० मार्च ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. योगेंद्र मेश्राम (रा. बोटेझरी) असे मृत शिक्षकाचे नाव असून ते गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कार्यरत होते.  मेश्राम यांची पत्नी कस्तुरबा चंदू देवगडे या बोटेझरी येथे कंत्राटी आरोग्य सेविका आहेत. मेश्राम दर शनिवारी पत्नीकडे यायचे. दरम्यान रविवारी ते ..

नक्षल्यांचा आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार थांबविला जावा

- जागतिक महिला दिनी महिला विकास साखळीचे आयोजन    गडचिरोली, नक्षल्यांचा आदिवासी महिलांवर होणार अत्याचार थांबविला जावा, नक्षल्यांकडून आदिवासी महिलांची होणारी हत्या थांबविण्यात यावी यासाठी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळीचे आयोजन करण्यात आले होते.    येथील इंदिरा गांधी चौकात जिल्हाधिकारी शेखर सिंह , पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरवात झाल्यानंतर त्यांनी वाहनातून विद्यार्थीनींच्य..

गडचिरोली : अहेरी आगाराच्या अहेरी-हैदराबाद बसला तेलंगणातील कारीमनगरजवळ अपघात, चालकाचा मृत्यू

     ..

गझलनंदा काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मानित

चामोर्शी कन्या व नागपूर येथील जेष्ठ कवयित्री सुनंदा पाटील यांना नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'माझा विचार आहे' या गझलसंग्रहाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरूनगर पुणे येथील पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार प्राप्त झाला आहे.  जेष्ठ दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या हस्ते सुनंदा ताईंचा सत्कार करण्यात आला. गझल सम्राट सुरेश भट यांची शिष्या असलेल्या सुनंदा ताई गझलनंदा या टोपणनावाने गेली ३५ वर्षे सातत्याने मराठी गझल लेखन करीत आहेत. तसेच नवोदितांना गझल तंत्राचे मार्गदर्शन करीत आहेत. ..

गडचिरोलीत दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

मूल,येथिल वार्ड क्र. सात मधील रहिवासी असलेल्या एका विद्यार्थिनीने घराजवळच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतकाचे नाव समिक्षा शरद भोयर, वय १६ वर्ष असे आहे. मृतक विद्यार्थिनी मूल येथिल स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळे..

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य अहेरीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य अहेरीत भव्य मॅरेथॉन स्पर्धा..

गोंडवाना विद्यापीठ निकालात मोठा गोेंधळ

-गोंडवाना विद्यापीठाकडून स्व-अध्यादेशाचीच पायमल्ली-55 टक्क्याचा निकष असताना 50 टक्क्यावर शेकडो उत्तीर्ण संजय रामगिरवार चंद्रपूर,आचार्य पदवी प्राप्त करण्याआधी त्यासंबंधीचे ‘कोर्सवर्क’ पूर्ण करावे लागते. गत तीन वर्षांपासून गोंडवाना विद्यापीठ ‘कोसवर्क’ची परीक्षा घेत आहे. या ‘कोर्सवर्क’चे अध्यादेश विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आहे. त्यात, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ५५ टक्क्याचे निकष पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे नमुद आहे. हे स्पष्ट असताना गेल्या तीन वर्षांपासून ..

गडचिरोली - आष्टीच्या व्यापाऱ्याकडे दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया नक्षलवाद्यांना अटक

   ..

गडचिरोली जिल्ह्यात विकास कामाचे ई - भूमिपूजन

गडचिरोली जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय व कठानी नदीवरील पूल व उपविभागीय परिवहन कार्यालयाचे लोकार्पण व विविध विकास कामाचे ई भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते विकास, परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन  गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री  अंबरीशराव आत्राम, खासदार अशोकजी नेते, चिमूर चे आमदार बंटीभाऊ भांगडिया, आमदार रामदासजी आंबटकर, विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोठेकर, आम डॉ देवराव होळी, आम कृष्णाजी गजबे, माजी आमदार ..

कुरखेड्यात गारपीट

कुरखेडा  गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे वादळ व गारपीटसह मुसळधार पाऊस सुरू असून विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे..

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १८ फेब्रुवारीला गडचिरोलीत विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

गडचिरोली, जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षात पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व नव्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे.   यावेळी चामोर्शी तालुक्यातील चिंचडोह सिंचन प्रकल्प, कृषी महाविद्यालयाची इमारत व कठाणी नदीवरील पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या ..