गोंदिया

दुबईत अडकलेले २५ युवक सुखरूप परतणार

रोजगारासाठी दुबईला गेलेले २५ युवक सुखरुप- जिल्हा पोलिसांची माहिती- कायदेशीर प्रक्रियेनंतर १० दिवसात येणार परतगोंदिया,समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून तिरोडा तालुक्यातील २५ युवक दुबईत अडकल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात तिरोडा पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते युवक सुखरुप असून, सुरु असलेल्या पाठपुराव्यामुळे कायदेशीर कारवाईनंतर येत्या १० ते १२ दिवसात ते युवक परत येणार असल्याचे पोलिस प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.   &..

नप उपाध्यक्षांची आमदारांच्या घरासमोर शिविगाळ

गोंदिया,येथील नगर परिषद उपाध्यक्ष शिव शर्मा यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानासमोर रविवार, १६ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास शिविगाळ केली. तसेच शर्मा यांनी कर्तव्यावर असलेल्या होमगार्डलाही शिविगाळ केल्याने या प्रकरणात त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.   तीन वर्षांपूर्वी शिव शर्मा यांनी आमदार अग्रवाल यांच्यावर एका हॉटेलात केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यातील वैर सर्वांनाच माहिती आहे. ..

शिक्षण विभागात आंदोलक शिक्षकांनी केली तोडफोड

- जिप प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन  गोंदिया, विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळेत शिक्षक नसल्याने आम्ही काय करावे, अशी विचारणा करण्याकरिता आलेल्या विद्याथ्र्यांना शिक्षणाधिकाèयांनी आज शाळेतच प्रवेश घेऊ नका असे उत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत आंदोलकांंनी शिक्षणाधिकाèयांचे कक्ष गाठत कक्षातील टेबल खुच्र्याची तोडफोड करुन जिप प्रवेशव्दारासमोर ठिय्या दिला. दरम्यान, परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. गत ९ ऑगस्टपासून ..

कावडीया युवकाचा नदीत बुडून मृत्यू

गोंदिया,महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करण्यासाठी पाणी घ्यायला वाघ नदीवर गेलेल्या कावडीया युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. आकाश आसाराम मरसकोल्हे असे मृत युवकाचे नाव आहे. शहरातील न्यू लक्ष्मीनगर येथील २५ युवक शिव पिंडीला जलाभिषेक करण्यासाठी वाघ नदीचे पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, आकाशला नदीत आंघोळ करण्याचा मोह झाला व तो पाण्यात उतरला. परंतु, पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहत गेला व त्याचा ..

'पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा'

मुंबई,ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत, येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. मात्र यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांना माहित आहे की विधानसभा निवडणुकीत ते जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी ईव्हीएम विरोधात विरोधकांनी महामोर्चा काढण्याचे ठरवले असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री यांनी लगावला आहे. गोंदिया येथील पत्रकार परिषेदेत ते बोलत ..

वनकर्मचार्यांनी दिले कासवांना जीवनदान

गोंदिया, वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया सुशील नांदवटे यांना गुप्त हेराकडून संदेश प्राप्त झाला की गोंदिया वनपरिक्षेत्र मध्ये पाच ते सहा कासव एका पाण्याच्या टाकीत ठेवले आहेत, त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सहाय्यक वनसंरक्षक तेंदू व कॅम्पा शेंडे यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन घेऊन तात्काळ आपल्या वन कर्मचारी आणि फिरते पथक गोंदिया क्रमांक एक सोबत वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मस्कर यांच्यासह नियोजित स्थळी पोहोचले. परिसरात शोध घेऊन पाच कासवांना वाचविण्यात आले. पंचनामा करून कासवांना ..

बाक्टी येथून बिबट्याची कातडी जप्त; तिघांना अटक

नवेगावबांध, अर्जुनी मोर तालुक्यातील नवेगावबांध वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या बाक्टी (चान्ना) येथे प्रादेशिक वनविभागाने एका घरावर धाड टाकून बिबट्याचे काडते जप्त करुन तीन आरोपींना अटक केली आहे. रविवारी (३० जुलै) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मंगेश नंदलाल बडोले रा.बाक्टी, विनोद जयगोपाल रुखमोडे रा.कटंगधरा व रविंद्र खुशाल वालदे रा. केसलवाडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.   नवेगावबांध प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिविक्षाधिन वनाधिकारी डी. एम. पाटील ..

जलयुक्तची १८ हजार कामे, तरीही शिवार कोरडेच!

गोंदिया,मुख्यमंत्र्यांचा डड्ढीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात चार वर्षांत १८ हजार ८१ कामे झालीत. पिकांना ऐनवेळी पाणी मिळावे व परिसराचा जलस्तर वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र, या चारही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कामाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही. भूजलसाठी निधी पाझरला. मात्र, पाणी मुरलेच नाही. आज ही सर्व कामे तहानलेली आहेत. त्यामुळे एका गावावर साधारणत: ७ ते ५२ लाखांचा खर्च झाला असताना शिवाराला कोरड लागल्याचे वास्तव आहे.  पाणीटंचाईवर मात करता यावी, पाण्याची ..

ट्रॅक्टर नाल्यात कोसळून चार मजूर ठार

गोंदिया, धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नाल्यात उलटून झालेल्या अपघातात चार मजूर ठार झाले, तर १३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तीन मजुरांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना आज सकाळी घडली.   धान रोवणीच्या कामासाठी काही मजूर एका ट्रॅक्टरमधून निघाले होते. गोंदिया-साकोली महामार्गावरील डव्वा येथे सकाळी दहा वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर एका नाल्यात उलटला. या अपघातात चार मजूर ठार झाले. तर १३ मजूर जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. जखमींना नजीकच्या ..

गोंदियाच्या युवकाचा हाजराफॉलमध्ये बुडून मृत्यू

सालेकसा,गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यांतर्गत येणार्‍या हाजराफॉल येथे 3 मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार, 21 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.  हेमंत लाटे गोंदिया असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेमंत वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत हाजराफॉल येथे गेला होता. आंघोळीची इच्छा झाल्याने तो पाण्यात उतरला. मात्र, खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती लगेच सालेकसा पोलिस ठाणे व पोलीस नियंत्रण ..

अंगणवाडी सेविकांच्या वाहनाला अपघात

 मोर्चात सहभागी होण्यासाठी गोंदियाला येत असतानाची घटना गोंदिया,गोंदिया येथे अंगणवाडी सेविकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी देवरी येथून गोंदियाला येत असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या वाहनाला आमगाव तालुक्यातील तिगाव जवळील जांभूळटोला येथे अपघात झाल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ४ अंगणवाडी सेविका गंभीर तर ८ सेविका किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. आमदार अग्रवाल यांनी विधानसभेच्या सभागृहात राज्यातील अंगणवाडी सेविकाबद्दल वापरलेले शब्द परत घ्यावे व सभागृहाची ..

धक्कादायक! विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत शिक्षिकेची हत्या

गोंदिया: शाळा सुरू असतानाच एका निर्दयी पतीने शिक्षिका पत्नीच्या शाळेत जाऊन इतर सहकारी शिक्षकांसमोरच आपल्या पत्नीला कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी ११ः३० वाजताच्या सुमारस गोंदिया तालुक्यातील ईर्रीटोला येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. विशेष म्हणजे हा थरार शाळेतील चिमूकल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखतच घडला. या घटनेने विद्यार्थ्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिभा दिलीप डोंगरे असे मृत शिक्षिकेचे नाव असून दिलीप डोंगरे असे आरोपीचे नाव आहे.   गोंदिय..

आई नव्हेस तू वैरिणी ; जिवंत नवजात शिशुला फेकले कचऱ्यात

गोंदिया: जिवंत नवजात शिशुला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकल्याची घटना रविवारी २३ जून रोजी सकाळी देवरी तालुक्यातील डवकी येथे उघडकीस आली. सरपंच व गावकऱ्यांनी या नवजात शिशुला देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात भर्ती केले असून त्याचेवर उपचार सुरू आहे. तर सदर नवजात शिशु सुखरुप असल्याची माहिती आहे.    डवकी येथील सरपंच उमराव बावणकर हे नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे फिरायला जात असताना, सिध्दार्थ हायस्कूलच्या जवळील रस्त्याच्या कडेवर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्यांना नवजात बालकाच्या ..

निवडणूक निकाल- भंडारा-गोंदिया

  ..

मोदींची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला अपघात

गोंदिया येथील नवीन बायपास मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपून परतणाऱ्या पोलिसांच्या बसला बुधवारी रात्री अपघात झाला. या अपघातात ११ जण जखमी झाले असून जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. गोंदिया-आमगाव मार्गावर ठाणा गावाजवळील गोरेगाव मार्ग वळण रस्त्यावर हा अपघात झाला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदियात सभा घेतली. या सभेसाठी पुण्यातील पोलिसांचे एक पथकही आले होते. बुधवारी सभा संपल्यानंतर पोलीस कर्मचारी पुण्यात परतत होते. रात्री १० च्या सुमारास गोंदिया-आमगाव ..

रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका

गोंदिया : बालाघाट येथील प्रवाशांच्या सुविधेसाठी गोंदिया-इतवारी रेल्वेगाडी बालाघाटवरून सुरू करण्यात आली. मात्र ही गाडी गोंदिया व बालाघाट येथील प्रवाशांना चांगलीच डोकेदुखीची ठरत आहे. पूर्वी गोंदिया-इतवारी रेल्वेगाडी गोंदियावरून दुपारी 3.10 मिनिटांनी सुटायची, तर सायंकाळी 6 वाजता इतवारी स्टेशनवर पोहोचायची. त्यानंतर ही गाडी पुन्हा डोंगरगडला जात होती. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची सुविधा होत होती. मात्र रेल्वेने महिनाभरापूर्वीच या गाडीचा विस्तार बालाघाटपर्यंत केला. तेव्हापासून ही गाडी गोंदिया, ..

भंडारा - गोदिंया लोकसभा मतदार संघात नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांचे नामांकन दाखल. तर २६ जणांनी ५५ अर्जांची केली उचल.

    ..