आंतरराष्ट्रीय:

आंतरराष्ट्रीय

प्रजासत्ताक दिनी लंडनमध्ये भारतीय संविधान जाळण्याचा पाकिस्तानचा कट

ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन आणि भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट रचला आहे. पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या या संभाव्य आंदोलनाबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी यूकेच्या प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे.   लंडनमधील भारतीय उच्चायुक्त रुची घनश्याम यांनी यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांना फोन केला व संविधानाच्या प्रती जाळण्याच्या या कटाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय उच्चायुक्तांनी गृह सचिव प्रिती पटेल यांच्याबरोबर ..

शक्य झाल्यास मध्यस्थी करू; ट्रम्प यांनी केली इम्रान खानची बोळवण

दावोस,पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज बुधवारी दावोस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे काश्मीरचे तुणतुणे वाजविले व हा प्रश्न सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले. मात्र, ट्रम्प यांनी कुठलेही ठोस आश्वासन न देता, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच, योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले.   दावोस येथील स्वीस स्की रिसोर्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अनुषंगाने इम्रान खान यांनी ट्रम्प यांची ..

येमेनमध्ये हुथी बंडखोरांचा क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला; ८० सैनिक ठार

येमेन,येमेनमध्ये करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यात किमान ८० येमेनी सैनिक ठार झाले असून हा हल्ला हुथी बंडखोरांनी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारिब भागात एका मशिदीवर हा हल्ला करण्यात आल्याचे वैद्यकीय व लष्करी सूत्रांनी म्हटले आहे.   गेले काही महिने इराण समर्थित हुथी व येमेनमधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सौदी प्रणीत लष्करी आघाडीचा पाठिंबा असलेले सरकार यांच्यातील संघर्ष बंद होता. पण त्यानंतर आता पुन्हा शनिवारी हल्ला झाला आहे. हुथी बंडखोरांनी सना या राजधानीच्या पूर्वेला ..

ट्रम्प यांच्या ‘युद्धज्वरा’ला अमेरिकच्या संसदेकडून ब्रेक

वॉशिंग्टन,इराण आणि अमेरिका यांच्यामधील राजकीय संबंध प्रचंड ताणवपूर्ण बनले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांना हल्ल्यांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच कृती युद्धाला पोषक ठरत आहे. त्यामुळे केव्हाही या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडू शकतो. याचे परिणाम केवळ इराण आणि अमेरिकेलाच नव्हे, तर संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. याची जाणीव झाल्याने अमेरिकेच्या संसदेने डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेषाधिकार कमी करण्याबाबतचा एक ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे ..

इराणमधील ५२ प्रमुख ठिकाणे निशाण्यावर, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

बगदाद, इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवत बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागल्याने युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील ५२ प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.   अमेरिकी ..