लेख

वैचारिक ‘समृद्धी’ की ‘दिवाळखोरी’?

मुंबई वार्तापत्र   नागेश दाचेवार नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या सहा ते आठ तासांवर आणणार्‍या सुमारे 46 हजार कोटी रुपयांचा आणि 700 किमीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘समृद्धी महामार्ग’ होय. हजारो हेक्टर जमिनीच्या अधिग्रहणाचे शिवधनुष्य यशस्वी रीत्या पेलल्यानंतर आज या प्रकल्पाचे काम सुरू देखील झाले आहे. मात्र, मागील सरकारमधील प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्या पाच वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळात सातत्याने या प्रकल्पाला विरोध केला. कधी जमीन अधिग्रहणावरून, ..

कर्नाटक पोटनिवडणुकीचा शोध आणि बोध...

दिल्ली वार्तापत्रश्यामकांत जहागीरदार  कर्नाटकमधील विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतील 12 जागा िंजकल्यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 12 विधानसभा मतदारसंघांतील विजयामुळे अल्पमतातील येदीयुरप्पा सरकारला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे.   या निकालांनी राज्यातील राजकीय अस्थिरता दूर होत भाजपाचे सरकार वाचले आहे. त्यामुळे येदीयुरप्पा आपला उर्वरित तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, याबाबत कोणतीच शंका ..

‘ॲक्सिडेंटल सी. एम.!’

मुंबई वार्तापत्र नागेश दाचेवर  काही वर्षांपूर्वी एक पुस्तक आले होते- ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर!’ तत्कालीन पंतप्रधान मनमोहन िंसग यांच्या माध्यम सल्लागाराने लिहिलेले ते पुस्तक होते. प्रत्यक्षात, अपघाताने पंतप्रधानाचे माध्यम सल्लागार झालेल्या व्यक्तीने लिहिलेल्या या पुस्तकाचे शीर्षक जरा खोचक वाटत असल्यामुळे त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र, लेखकाने आपल्या चष्म्यातून मनमोहन िंसगांना पंतप्रधान होताना ज्या ज्या काही घडामोडी बघितल्या त्यावरून ते या निष्कर्षावर पोहोचले ..

‘अधीर’पणामुळे होते लोकांचे ‘रंजन!’

दिल्ली वार्तापत्र श्यामकांत जहागीरदार विरोधी पक्षनेतेपद हे संसदीय लोकशाहीतील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. मग ते संसदेतील असो की राज्याच्या विधिमंडळातील. या पदावरील व्यक्तीने सरकारवर कडाडून टीका करणे समजण्यासारखे आहे. नव्हे, विरोधी पक्षनेत्याचे ते घटनात्मक कर्तव्यच म्हणावे लागेल. मात्र, सरकारवर टीका करताना ती औचित्याला धरून तसेच वस्तुनिष्ठ असली पाहिजे. ‘उचलली जीभ लावली टाळूला’ अशा प्रकारची टीका या पदावरील व्यक्तीला शोभणारी नसते. यातून संबंधित व्यक्तीच्या अधीरतेचे म्हणजे उतावीळपणाच..

तुझे आहे तुजपाशी, पण जागा चुकलाशी...!

मुंबई वार्तापत्र नागेश दाचेवार  आपले अनैतिक संबंध कसे नैतिक आहेत, हे सिद्ध करण्यासाठी, अनैतिक कृत्य करणार्‍यांकडून वाटेल ते दाखले आणि वाटेल तो संदर्भ देऊन, तो कसा योग्य आहे, हे पटवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात. वर्षानुवर्षे असेच चालत आले आहे. राज्यातील राजकारणातली परिस्थिती काहीशी अशीच झालेली दिसते. राजकीय अनैतिकतेचा कळस यावेळी गाठला गेला असल्याने, आपण केलेल्या अनैतिक कृत्यांवर पांघरुण घालण्याचा प्रकार आता, निवडणूकपूर्व करार पायदळी तुडवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमवेत नव्या ..

अजितदादांवर ‘काका मला वाचवा’ची वेळ!

 दिल्ली वार्तापत्र श्यामकांत जहागीरदार  मराठेशाहीच्या इतिहासात राघोबादादा उपाख्य रघुनाथराव यांचे पुतणे नारायणराव यांचा पेशवाईतील अंतर्गत सत्तासंघर्षात बळी गेला. रघुनाथरावांनी, नारायणरावांना धरावे, असे आदेश दिले होते, पण त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी ध चा मा केला, म्हणजे, धरावेच्या ऐवजी मारावे, असे आपल्या सोयीचे बदल कथित आदेशात केले. परिणामी गारदी मारायला आले असताना ‘काका मला वाचवा,’ म्हणून नारायणरावांनी फोडलेली आर्त किंकाळी वाया गेली.   थोड्याफार फरकाने ..

सत्तेचं लग्न आणि सतराशे विघ्न!

मुंबई वार्तापत्रनागेश दाचेवार महाशिवआघाडी म्हणा, महाविकासआघाडी म्हणा किंवा मग तिघाडी म्हणा, हे सगळं नव्या सत्तासूत्राचे नवे समीकरण अर्थात एकप्रकारे नामकरणच होय. गेल्या कित्येक दिवसांपासून चाललेल्या या चर्चा, बैठकांचे सत्रं, खलबतं झाल्यानंतरही कुठल्या एका निर्णयावर येताना हे लोक दिसत नाही. दरम्यान, सातत्याने सत्तास्थापनेचा दावा एकदोन दिवसांत केला जाईल, असा दावा करणार्‍यांचे पुन्हा प्रत्येक गोष्टीत संदिग्धता, गुप्तता पाळण्यातच दिवस चालले असून, पुन्हा त्यांचे घोडे बैठकींच्या गुर्‍हाळावरच ..

अयोध्या- रामजन्मभूमीचा इतिहास

मध्य आशियातील एक सामान्य प्रदेश फरगना नावाचा. त्याची राजधानी होती अंदिजान. उमर शेख मिर्जा नावाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी शासक तिथे होता. त्याने समरकंद-ताश्कंदसारख्या बलाढ्य राज्यांवर अनेकदा स्वारी केली, पण प्रत्येक वेळी पराजितच झाला. शेवटी आपल्या कबूतरबाजीच्या शौकापायी एका नदीत पडून मृत्यू पावला. त्याच्या चार मुलांपैकी सगळ्यात मोठा मुलगा बाबर. जो त्या वेळी केवळ अकरा वर्षांचा होता, तो गादीवर बसला.   बाबर हा अतिशय चारित्र्यहीन, अत्याचारी आणि निर्लज्ज होता. त्याने ‘बाबरनामा’ ..

वायुप्रदूषणाचा धोका वेळीच ओळखावा!

वायुप्रदूषणाची जीवघेणी समस्या दिवसेंदिवस कमालीची गंभीर होत असूनही तिच्याकडे पाहिजे तेवढ्या गार्ंभीयाने लक्ष दिले जात नाही, ही मोठीच िंचताजनक बाब आहे. हे दुर्लक्ष, हा निष्काळजीपणा म्हणजे सरसकट मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे ठरणार आहे. पाण्याशिवाय काही तास, अन्नाशिवाय काही दिवस िंकवा इतर काही गरजांशिवाय महिनोमहिनेही जगता येईल. परंतु, श्वास घेण्यासाठी प्राणवायूयुक्त शुद्ध हवा मिळाली नाही तर काही मिनिटातच हृदयक्रिया बंद पडून प्राणोत्क्रमण होण्याची शक्यता आहे. हे सांगण्याची वास्तविक गरज नाही. तरीही देशातील ..

शिलास्मारक जडणघडणीचा प्रवास : एक दृष्टिक्षेप

19 नोव्हेंबर 1914 रोजी नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील टिमटाळा येथे एकनाथजी रानडे यांचा जन्म झाला. ते अतिशय शिस्तप्रिय, कुस्तीपटू, कणखर व धाडसी आणि सहनशील वृत्तीचे होते. संघाचे ते प्रमुख प्रचारक होते. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना 1930 मध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांकडे ते वळले. वर नमूद केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या आव्हानाने त्यांचे हृदय काबीज केले. आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करण्याचा त्यांनी निर्धार केला. ते म्हणत युवकांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित ..

गोष्ट तान्हुल्याच्या आगमनाची...

पल्लवी पडोळे दत्तक क्षेत्रात कितीही आमूलाग्र बदल झालेला असला तरी अजूनही दत्तकाबाबत मुलांना सांगण्याचा पालकांचा कल कमीच आहे. आजही मुलांना दत्तकाबाबत सांगण्यास पालक टाळाटाळ करतात. न सांगण्याचे दुष्परिणाम पालकांपर्यंत पोहचवावे, हाच या लेखनामागील मुख्य उद्देश.  संपूर्ण दत्तकविधानाच्या प्रक्रियेत मुलांना दत्तकाबाबत सांगणे ही सगळ्यात नाजुकबाब आहे. आजही 40 टक्क्यांपेक्षाही कमी पालक हे सत्य मुलांना सहजगतीने सांगतात. पालकांना आपलं मुलं नेहमीच लहान वाटत असतं. आज सांगू, उद्या सांगू करत करत मुलं ..