महाराष्ट्र

नवे सरकार हे स्थगिती सरकार, कोकणचा विकास रखडला : नारायण राणे

मुंबई,भाजपा खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील नव्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या नव्या सरकारमध्ये मंत्री नाहीत, खाती नाहीत, हे तीन पक्षांचे सरकार आहे, या पक्षाचे कोकणात अस्तित्व दिसत नाही, यामुळे कोकणात विकास कामे ठप्प झाली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. तसेच भाजपाचे नेते १५ ते १८ डिसेंबर दरम्यान सिंधुदूर्ग दौरा करणार असल्याचेही यावेळी राणे यांनी सांगितले.   हे सरकार दीर्घकाळ चालणार नाही, हे ..

बलात्काराचे दीड लाखावर दावे न्यायाच्या प्रतीक्षेत

पुणे,देशभरतील बलात्काराचे दीड लाखाच्या वर दवे न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली आहे. देशातील विविध कोर्टांमध्ये एक लाख ६७ हजार बलात्काराच्या दाव्यांची सुनावणी प्रलंबित आहे. यातील ९६ टक्के दावे हे 'पोक्सो' अंतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत. यापैकी उत्तर प्रदेशात सर्वांधिक ३६,००८ दाव्यांची सुनावणी प्रलंबित आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असून, राज्यात २२ हजार ७७५ बलात्कारांच्या दाव्यांची सुनावणी प्रलंबित आहे. देशभरातील या प्रलंबित दाव्यांची चिंताजनक आकडेवारी लक्षात ..

पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती - मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

मुंबई, महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील, तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागातील पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. तथापि, त्रुटी दूर करूनही परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारेच ऑनलाईन घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी दिले.महापरीक्षा पोर्टलच्या अनुषंगाने अनेक निवेदने, तक्रारी मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञान विभागाची ..

‘मी परत येईल’ यात गर्व नव्हता : देवेंद्र फडणवीस

मुंबई,विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘मी पुन्हा येईन’ असे मी जाहीरपणे सांगितले होते. यात कुठेही गर्वाची भावना नव्हती. ती कवितेतील एक ओळ आहे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी मांडली.    एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत भाजपाला अतिआत्मविश्वास नडला का, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची साधी ओळ आहे. प्रचारातील भाषणात ..

देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांबद्दल गौप्यस्फोट!

मुंबई, विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिन्याभरातील राज्यातील सत्तानाट्यावर भाष्य केले आहे. 'काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणे शक्य नाही. भाजपसोबतच सरकार स्थापन केले पाहिजे, असे मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितले होते. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,' असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ..

फाशी होत नसेल तर एन्काऊंटर योग्यच : अण्णा हजारे

अहमदनगर,‘देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहे,’ अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे.   हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. यासंबंधी प्रसारमाध्यमांकडे अण्णा हजारे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हैदराबादमधील ..

कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्यायही योग्य वाटतो- राज ठाकरे

मुंबई, हैदराबादमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केले आहे. राज यांनी ट्विट करून यासंदर्भात भाष्य केले आहे. कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो, असे राज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये पशुवैद्यक असलेल्या तरुणीवर चार तरूणांनी बलात्कार केला होता. यानंतर आरोपींनी या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह जाळला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी ..

सोन्या चांदीच्या किंमतीत घसरण

मुंबई, परदेशी बाजारात आलेल्या घसरणीच्या संकेतांमुळे, देशांतर्गत वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत एक टक्का आणि चांदीच्या किंमतीत दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चांदीच्या किंमतीत एक हजार रुपये प्रतिकिलोहून अधिक घसरण झाली आहे.   फेब्रुवारी २०२०च्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात वायदे बाजारात रात्री ९.३० वाजता सोन्याच्या किंमतीत गेल्या सत्राहून ३७९ रुपये म्हणजे एक टक्क्याची घसरण होत, सोन्याचा दर ३७ हजार ७०६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला. तर यापूर्वी फेब्रुवारी ..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना खासदारांसोबत बैठक

मुंबई,संसद अधिवेशनातील व्यूहरचना, सिटीजनशीप अमेंडन्मेंट बिल आणि राज्यातील मुद्दे यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची उद्या बैठक बोलवली आहे. मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांची युती झाली होती. त्यानंतर विधानसभेत युतीने निवडणूक लढवूनही शिवसेनेने  राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. आता लोकसभेत सत्ता पक्षाची कोंडी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ..

परभणी रेल्वेस्थानकावर भीषण आग, प्रतीक्षालय खाक

परभणी,स्थानिक रेल्वेस्थानकातील प्रवासी विश्रामकक्षाजवळील स्वच्छता विभागाच्या कार्यालयास गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आग लागली. यात दोन प्रतीक्षालय खाक झाल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिली.   रेल्वेस्थानकातील प्लॅटफ फॉर्म क्रमांक एकवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या पश्चिमेकडील बाजूला स्थानिक उपप्रबंधकाच्या कार्यालयालगत प्रथम आणि द्वितीय श्रेणी प्रवासी विश्रामगृह आहे. त्याच्या समोरच शौचालय असून, स्वच्छता विभागाचे कार्यालयही आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बंद ..

बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित

मुंबई,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल २२ वर्षे जिथे वास्तव्य केले ते परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली.बीआयटी चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० व ५१ या दोन खोल्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचे १९१२ ते १९३४ असे प्रदीर्घ काळ वास्तव्य होते. येथूनच ते विश्वविख्यात ..

पत्नीच्या हत्येनंतर पतीचे आत्मसमर्पण

पुणे,  पत्नीची हत्या करून पतीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची घटना चिंचवडमध्ये आज सकाळी घडली आहे. हसनसाहब दस्तगिरसाहब नदाफ असे आरोपी पतीचे नाव आहे तर, बानू हसनसाहब नदाफ असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील दगडोबा चौकात नदाफ कुटुंब मागील दहा महिन्यांपासून राहत आहे. हसनसाहब हा टेलरिंगचे काम करतो. हसनसाहब याचा पहिला विवाह नसरीन यांच्याशी झाला. नसरीन यांचा मृत्यू झाल्यानंतर २०११ साली त्याने मयत बानू यांच्याशी दुसरा विवाह केला होता. ..

दोन दिवसांत होणार ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज दिली.२८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सरकार अस्तित्वात येऊन आठवडा उलटला तरी ठाकरे यांना नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झालेले नाही. काँग्रेसमध्ये मंत्रिपदे आणि खात्यांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खातेवाटपाची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात ..

असा न्याय चंबळचे डाकू सुद्धा द्यायचे: उज्ज्वल निकम

मुंबई, हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हते,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. 'झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,' असेही निकम म्हणाले. हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हतं,' असे स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांनी मात्र हा प्रकार ..

महापरिनिर्वाण दिनानिमित्य चैत्यभूमीवर जनसागर

मुंबई,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर एकत्र आले आहेत. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये निधन झाले होते. तेव्हापासूनच हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला आहे. दलित समाजाला तसेच अस्पृश्यतेची वागणूक मिळणाऱ्या प्रत्येकासाठीच बाबासाहेबांनी न्याय मिळवून द्यायचा ..

काँग्रेसचे नगरसेवक फूटले, भिवंडीत भाजपा आघाडीचा महापौर

ठाणे, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजपा कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांची महापौरपदी निवड झाली. उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान निवडून आले आहेत. या राजकीय घडामोडीमुळे सत्ताधारी काँग्रेस शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का असल्याचे मानले जात आहे.    भिवंडी महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या ..

दहावी-बारावीच्या मार्कशीटवरुन ‘नापास’ शेरा होणार हद्दपार!

मुंबई,10 वी आणि 12वीच्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर आता ‘‘नापास’’ असा शेरा येणार नाही. त्याऐवजी तेथे ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे.'   याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने जारी केला आहे. दहावी, बारावी परीक्षेत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य ..

६५० मासेमारांची अरबी समुद्रातून सुखरूप सुटका

   मुंबई, अरबी समुद्रात अचानक निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे वादळ निर्माण झाले. वादळात अडकलेल्या सुमारे ६५० मच्छिमारांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. यासाठी एकूण सात व्यापारी जहाजे, आठ तटरक्षक दलाच्या नौका व दोन टेहळणी विमानांची मदत घेण्यात आली.यासाठी तटरक्षक दलाने सुरूवातीला दोन व्यापारी जहाजांची मदत घेतली होती. बुधवार रात्री ते गुरूवारी सकाळी आणखी पाच जहाजांना यासाठी विनंती करण्यात आली. त्यानंतर तटरक्षक दलाकडून बुधवारी एकूण चार जहाजे या बचावकार्यासाठी वापरली गेली ..

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाशी फारकत घेणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का

मुंबई,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. फडणवीस सरकारने निवडणुकी आधी घेतलेल्या अनेक निर्णयांना त्यांनी स्थगिती दिली आहे. दरम्यान, मुंबईतच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सेनेच्या 400 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला असून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन केल्याने हे कार्यकर्ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सेनेने भ्रष्ट आणि विरोधी दलांशी हातमिळवणी ..

पुणे: तरुणीची गळा दाबून हत्या

पुणे,  सिंहगड रोडवरील माणिक बाग परिसरात एका तरुणीचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. ही तरुणी एमबीए ग्रॅज्युएट होती. पुण्यामध्ये ती ती कुटुंबीयांसोबत राहत होती. गेल्या आठवड्यात ते सगळे मूळ गावी बीडला गेले होते. तरुणीचा इंटरव्यू असल्याने ती एकटीच पुण्यात परतली होती. मात्र त्यानंतर रविवारी दिवसभरात तिचा फोन लागला नाही म्हणून तिची आई थेट पुण्यात आली. त्यावेळी घर बंद होते. त्यामुळे पोलिसांना बोलावून घर उघडण्यात आले. त्यावेळी घरात तरुणीचा मृतदेह आढळून आला. धक्कादायक म्हणजे घरात काही दारूच्या ..

गर्दीत धक्का लागल्याने प्रवाश्याला धावत्या लोकलमधून ढकलले

 मुंबई, लोकलमध्ये सकाळी गर्दीच्या वेळेत झालेल्या वादामुळे एका प्रवाशांला धावत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. विजय राम गुप्ता असे या प्रवाशाचे नाव आहे. जखमी विजयवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे.मानखुर्द येथे राहत असलेल्या विजयने मानखुर्द स्थानकातून आज सकाळी ९ च्या सुमारास सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. लोकलला गर्दी असल्याने मोठ्या कसरतीने विजयने आत प्रवेश केला. कुर्ला स्थानक येण्यापूर्वी अनेक प्रवासी उतरण्याच्या तयारीत होते. यावेळी विजय आणि अज्ञात प्रवाशांमध्य..

‘पीएमसी’चे शिखर बँकेत विलीनीकरण करा

-महाराष्ट्र सरकारचा सल्लामुंबई,घोटाळाग्रस्त पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्यासाठी या बँकेचे महाराष्ट्र राज्य सहकारी या शिखर बँकेत विलीनीकरण करण्यात यावे, असा सल्ला राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी आज गुरुवारी दिला.   पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँक शिखर बँकेत विलीन करण्यासाठी गरज भासल्यास राज्य सरकार भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा करण्यास तयार आहे. पीएमसीच्या गरीब खातेधारकांना दिलासा मिळावा, यासाठी पीएमसी बँक विलीन करून घेण्याचे प्रयत्न करावेत, अशी ..

पर्यटकांची नौका पलटली; एकाच मृत्यू

 सिंधुदुर्ग, कोकण किनारपट्टीवर वादळाचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टी व खाडीपट्ट्यात सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचाच फटका पर्यटकांच्या नौकेला बसला, मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक नौका कलंडून नौकेतील ९ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यापैकी ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे तर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माया आनंद मोरे असे या महिलेचे नाव असून त्या कल्याणमधील आंबिवली येथील रहिवाशी आहेत.  व ही नौका कलंडून दुर्घटना ..

मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाशी फारकत घेणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का

मुंबई,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. फडणवीस सरकारने निवडणुकी आधी घेतलेल्या अनेक निर्णयांना त्यांनी स्थगिती दिली आहे. दरम्यान, मुंबईतच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सेनेच्या 400 कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला असून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन केल्याने हे कार्यकर्ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, सेनेने भ्रष्ट आणि विरोधी दलांशी हातमिळवणी ..

यंदा अभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी होणार स्वतंत्र प्रवेश परीक्षा

मुंबई,अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे की वैद्यकीय क्षेत्रात? या गोंधळात असलेले विद्यार्थी यापूर्वी या दोन्हीच्या प्रवेश परीक्षा देत होते आणि त्यासाठी सीईटीच्या पीसीएमबी पर्यायाचा अवलंब करीत होते. मात्र एप्रिल २०१९ मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटीत विद्यार्थ्यांना पीसीएमबी हा पर्याय नसेल; त्याऐवजी पीसीबी, पीसीएमसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागेल. यावर बुधवारी सीईटी सेलने शिक्कामोर्तब केले. हा निर्णय एआरएच्या बैठकीत अंतिम झाल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.   अभियांत्रिकी ..

राज्याला एकाचवेळी दोन वादळांचा धोका; उद्या मुंबई, पुण्यात पावसाचा अंदाज

मुंबई,अरबी समुद्रामध्ये पुन्हा एकदा एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची दाट शक्यता असून पवन आणि अम्फन अशी या वादळांची नाव आहेत. येत्या २४ तासांत ही चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिक भागात उद्या पावसाचा अंदाज 'स्कायमेट'ने वर्तवला आहे.    क्यार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा एकदा तशीच परिस्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. ही परिस्थिती दुर्मिळ मानली जाते. अरबी ..

शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला; छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

कोल्हापूर, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.   कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक स्थळांचा ..

लोकलमध्ये विसरली अडीच लाख किंमतीचं सोनं

मुंबई,दैवाची साथ असेल तर अनेक गमावलेल्या गोष्टीही परत मिळतात, असं म्हटलं जातं. मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मीनल बरिया या महिलेला त्याचा नुकताच अनुभव आला. मीनल लोकलमध्ये चुकून त्यांची बॅग विसरल्या. या बॅगेत थोडं थोडके नव्हे तर अडीच लाख रुपये किंमतीचे सोने होते. ही बॅग हरवल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण दैव बलवत्तर होतं म्हणून अवघ्या दोन तासातच त्यांना त्यांची हरवलेली बॅग अडीच लाखाच्या सोन्यासहित परत मिळाली.माझ्या हातात तीन बॅगा ..

मेहुल चोक्सीला दणका; 'फरार' घोषित होण्याची शक्यता

मुंबई,पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर परदेशात पसार झाल्याने परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत परागंदा आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (इडी) विशेष पीएमएलए न्यायालयात केलेल्या कायदेशीर कार्यवाहीला स्थगिती देण्याची आरोपी मेहुल चोक्सीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. त्यामुळे इडीच्या अर्जावर निर्णय देण्यास विशेष न्यायालयाला कोणतीही आडकाठी राहिलेली नाही. 'विशेष पीएमएलए न्यायालयाने वारंवार समन्स व वॉरंट बजावूनही चोक्सी न्यायालयासमोर हजर झालेला नाही. ..

"मेट्रो बंद करून मत्सालय घालणे म्हणजे तिघाडी सरकारची बौद्धिक दिवाळखोरी"

मुंबई, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर बोलावण्यात आलेल्या पहिल्याच अधिवेशनात विरोधीपक्षात असलेल्या भाजपानं सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.   देवेंद्र फडणवीस यांना अहम नडला असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. यावरून भातखळकर यांनी टीका केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखल शरद ..

राज्यातील बेकायदा स्कूल व्हॅनवर कारवाई

मुंबई,बेकायदा आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. परवानाधारकांकडूनही स्कूल बसच्या सुरक्षा नियमांचा भंग केला जात असल्याच्या तक्रारी पालकांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे केल्या आहेत. त्यानुसार १० डिसेंबरपर्यंत स्कूल बसची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.   विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) स्कूल बसना परवानगी दिली असून, सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम आखून दिले आहेत; परंतु परवानाधारकांकडूनच या ..

इतर देशांच्या तुलनेत भारतातील मोबाइल शुल्क स्वस्तच!

मुंबई,भारतात व्होडाफोन-आयडीया, एअरटेल आणि जिओच्या दरवाढीने ग्राहकांच्या मनात धडकी भरवली असली तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील मोबाइल कॉलचे दर कमी आहेत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. सध्याचे दर हे मागील चार वर्षांतील कमी दर असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार नाही, असे मत केंद्र सरकारने व्यक्त केले आहे. व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल आणि जिओ या कंपन्यांनी रविवारी दरवाढीची घोषणा केली. यामुळे मोबाइल सेवा सरासरी ४० टक्क्यांनी महागणार आहे. यावर भाष्य करताना सरकारने ..

राज्यातील विकासाच्या एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई, राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा आज आढावा घेण्यात आला आहे. विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून एकही प्रकल्प बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सुमारे चार तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत मागच्या सरकारने सुरू ..

बंडखोरी माझ्या रक्तात नाही; 'त्या' फेसबुक पोस्टवर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण

मुंबई, कोणत्या मार्गाने जायचं हे १२ डिसेंबरला सांगणार अशी फेसबुक पोस्ट केल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, पंकजा मुंडे यांनी याविषयी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. दबावतंत्रासाठी मी फेसबुक पोस्ट केली नाही. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे. बंडखोरी माझ्या रक्तात नाही. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला. चुकीच्या बातम्यामुळे मी व्यथित झाले. पक्षासी मी बांधील आहे. तसेच भाजप पक्ष सोडण्याबाब..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीचवर फडकणार मानाचे ‘निळे निशाण’

मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीचवरती एक नवे निशाण फडकणार आहे. ते म्हणजे अत्यंत मानाच मानांकन असलेले “ब्ल्यू फ्लॅग.”केंद्र सरकारच्या पर्यावरण व वनविभागाने अलिकडेच भोगवे बीचला हे मानांकन मिळाल्याचं जाहीर केले. असे स्टेटस मिळवणारा भोगवे हा महाराष्ट्रातील पहिला बीच आहे. अशाप्रकारे भारतातील एकूण तेरा समुद्रकिनाऱ्यांची निवड ब्ल्यू फ्लॅग फडकवण्यासाठी करण्यात आलेली आहे. भोगवे समुद्रकिनारा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ला तालुक्यात आहे.   ब्ल्य..

औरंगाबादमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

औरंगाबाद,औरंगाबाद शहरात मंगळवारी सकाळी एक बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली होती. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, तो हाती लागत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान, भरवस्तीत बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.   सकाळी साडेसहा वाजता सिडकोतील एन १ भागात असलेल्या काळा गणपती मंदिरामागील वॉकिंग ट्रॅक भागात स्थानिकांन..

मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मत्स्यालय; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई, देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी शहरात बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या प्रमाणे जागतिक दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) राज्य सरकार उभारणार आहे. मत्स्यालयाच्या उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.   ..

प्लास्टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पिंपरी, हिंजवडी आयटी पार्क मधील टीसीएस कंपनीत सहाव्या मजल्यावर फ्रंट ऑफिस मध्ये काम करणाऱ्याने आत्महत्या केली. मंगळवार (३ डिसेंबर) सकाळी ही घटना घडली आहे.   कपिल गणपत विटकर असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विमानात बॅगची चेन लॉक करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक टॅग एकत्र करून त्याने गळ्याला फास (लॉक) करून आत्महत्या केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल यांचा मागील महिन्यात राहत्या घरात अपघात झाला होता. तेव्हा पासून त्यांच्या पाठीला दुखणे सुरू झाले आहे. मागील ..

शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरवात केलीच- किरीट सोमय्या

मुंबई, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले आणि सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. त्यामुळे भाजपा नेते शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत असल्याचे  पाहायला मिळत आहे. आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.  किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला, ..

नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

   मुंबई, गेल्या वर्षी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान आंदोलकांनी कायदा हातात घेतल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे नाणारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे यांनी आरे मेट्रो आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे ..

शेतकरी सुखावला! कांद्याला मिळाला ११० रु. किलो बाजारभाव

मुंबई,दुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे उभी कांद्याची पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी गावाचे शेतकरी मुक्ताजी गदादे या शेतकऱ्याच्या 23 पिशवी कांद्याचे 1 लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे. गदादे यांनी आपला कांदा सोलापूर येथील बाजार समितीत पाठवला होता तेथे त्यांच्या कांद्याला किलोला 110 रूपये बाजारभाव मिळाल्याने गदादे अवघ्या 23 पिशव्यांत लखपती झाले आहेत. पुणे जिल्ह्यात रब्बी ..

शेतकरी सुखावला! कांद्याला मिळाला ११० रु. किलो बाजारभाव

मुंबई,दुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे उभी कांद्याची पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी गावाचे शेतकरी मुक्ताजी गदादे या शेतकऱ्याच्या 23 पिशवी कांद्याचे 1 लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे. गदादे यांनी आपला कांदा सोलापूर येथील बाजार समितीत पाठवला होता तेथे त्यांच्या कांद्याला किलोला 110 रूपये बाजारभाव मिळाल्याने गदादे अवघ्या 23 पिशव्यांत लखपती झाले आहेत.  पुणे जिल्ह्यात ..

पंकजा मुंडें भाजपात होत्या, आहेत अन् राहतील; चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

मुंबई,विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज्यातले अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या वाट्यावर आहेत. पंकजा मुंडे काय करतात, ते 12 डिसेंबरला कळले, असे सूचक विधान केले होते. मात्र, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी पंकजा मुंडें भाजपात राहतील, असे स्पष्टीकरण दिले आहे.  पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही ..

कमी व्याजदरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी सक्रिय

मुंबई, मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर कॉर्पोरेट कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मुंबईसह इतर राज्यातील व्यापारांना आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना गाठून त्यांना सोशल माध्यमांच्या द्वारे कमीत कमी कागदपत्रांमध्ये कमी व्याजात मोठ्यात मोठे  कर्ज मिळून देण्याचे आमिष दाखवत होती. ..

सोनई हत्याकांडातील पाच आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

मुंबई, २०१३मध्ये अहमदनगरच्या सोनई गावात  संदीप राज थनवार, राहुल कंडारे, सचिन घारू या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे हत्याकांड राज्यभरात गाजले होते. या हत्याकांड प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तर पुराव्यांअभावी अशोक नवगिरे याची शिक्षा न्यायालयाने रद्द केली. रमेश दरवळे, प्रवीण दरवळे, प्रकाश दरवळे, संदीप कुरे या आरोपींची फाशी कायम आहे.    प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे ..

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला

मुंबई,विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल मधील 'सागर' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना समुद्रकिनारी असलेला 'रामटेक' बंगला देण्यात आला आहे.   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार वर्षा बंगाला देण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रॉयलस्टोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन बंगला ..

पाणीपुरी विकणाऱ्या तरुणाची भारताच्या अंडर-१९ वर्ल्ड कप टीममध्ये निवड

 मुंबई, पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर-१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. १५ सदस्यांच्या या टीमचे  नेतृत्व उत्तर प्रदेशमधल्या मेरठच्या प्रियम गर्गला देण्यात आले आहे. अंडर-१९ वर्ल्ड कप १९ जानेवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीममध्ये मुंबईच्या यशस्वी जयस्वालचीही निवड करण्यात आली आहे.  नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना यशस्वी जयस्वालने द्विशतक केले होते. स्थानिक ..

शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आनंद – मुख्यमंत्री

मुंबई, विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर त्यांनी आपला कार्यभार स्विकारला. यावेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांचे अभिनंदन केले तसेच शेतकरीपुत्र विधानसभा अध्यक्ष झाला याचा आपल्याला आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.   मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सभागृहाचा नेता म्हणून सभागृहाच्यावतीने आपले स्वागत करतो. विधानसभा हे राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. याचे कामकाज तुम्ही चांगल्यापद्धतीने पार ..

सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची तात्काळ मदत द्यावी - देवेंद्र फडणवीस

मुंबई, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.   विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,”नियम ५७ची नोटीस दिली आहे. अध्यक्षांची घोषणा करायची आहे. पण, नियम ५७ची सूचना महत्वाची आहे. त्यामुळे ..

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना मदतीचे साकडे

मुंबई,  गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.  रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,”युती आघाडीतील ..

…मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा; देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदनाच्या ठरावावर उत्तर

मुंबई,विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. अभिनंदनाच्या ठरावाला देवेंद्र फडणवीस यांनी मार्मिक भाषेत उत्तरे दिली. “मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूँ लौटकर जरूर आऊंगा,” असे सांगत फडणवीसांनी पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत दिले.     विधानसभेचे कामकाज ..

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड

मुंबई, विधानसभा अध्यक्षपदाची आज होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा करण्यात आली.   याबाबत माहिती देताना, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद ..

७० फुटावरून कोसळूनही तरुणी बचावली!

कोल्हापूर,उजळाईवाडी येथील उड्डाणपूलावरून उलट्या दिशेने शाहू नाक्याकडे जाणाऱ्या दुचाकीला चारचाकी गाडीने समोरासमोर जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली तरुणी उड्डाणपूलावरून ६० ते ७० फूट खाली कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून एवढ्या उंचावरून कोसळूनही ही तरुणी वाचली. या अपघातात तिच्याबरोबर तिच्या भावालाही प्रचंड मार लागला असून दोघांवरही सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. ..

पाकिस्तानात थेट युद्धाचे धाडस नाही : राजनाथ सिंह

पुणे,भारतासोबत समोरासमोर उभे ठाकून युद्ध करण्याचे धाडस पाकिस्तानात नसल्यामुळेच हा देश दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध करीत असतो, अशी तोफ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शनिवारी येथे डागली.   पारंपरिक युद्ध झाल्यास आपला पराभव अटळ आहे, याची जाणीव पाकिस्तानला आहे. आजवरच्या तीन युद्धांमध्ये त्यांना तसा अनुभवही आलेला आहे. त्यामुळे या देशाने भ्याड हल्ले सुरू केले आहेत. या छुप्या युद्धातही पाकिस्तानलाच वारंवार पराभवाचा सामना करावा लागत आहे, असे राजनाथ सिंह यां..

तुळजाभवानीचे दागिने पुन्हा गायब; समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कृत्य

तुळजापूर,महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठापैकी एक म्हणजे तुळजापूर, राज्यभरातून मोठ्या श्रद्धेने भक्त तुळजाभवानीच्या दर्शनाला येत असतात. या तुळजाभवानीच्या मंदिरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने गायब झाले आहेत. मौल्यवान माणिक, चांदीचे दोन खडाव आणि विविध राजांनी, त्यांच्या राजवाड्यांकडून दिलेली 71 पुरातन नाणी या मंदिर संस्थानाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गायब केली आहेत. यासांबंधीचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकारी आणि विधीमंडळाकडे दिला आहे.  मं..

सभागृहाचे कामकाज नियमबाह्य; भाजपाचा सभात्याग, राज्यपालांना देणार पत्र

मुंबई,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभेची विशेष अधिवेशन यासाठी बोलविण्यात आलं होतं. मात्र संविधानाची पायमल्ली करुन सभागृहाचं कामकाज सुरु आहे, विधानसभा अधिवेशन नियमाला धरुन बोलाविले नाही, राज्यपालांनी कोणतंही समन्स काढलं नाही, त्यामुळे हे अधिवेशन असैविधानिक आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.   यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध आहे. शपथ घेताना एक मसूदा असतो. राज्यपालांनी ..

सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी मनसे तटस्थ

मुंबई,महाराष्ट्र विधानसभेत आज शनिवारी मांडण्यात आलेल्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीने विनासायास बहुमत सिद्ध केले. २८८ आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा सरकारला हवा होता, तो या नव्या सरकारने मिळवला आणि १६९ मतांनी ठराव जिंकला. विरोधी भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला होता, मात्र सभागृहात उपस्थित असलेल्या ज्या चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहणे पसंत केले त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव आमदाराचाही ..

“महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असे घडलेले नाही”, देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले

मुंबई, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचं आजचं कामकाज हे पूर्णपणे संविधानाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने रेटून करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असं घडलं नाही अशी टीका केली आहे. भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत चाचणी आज पार पडली असून यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केलं. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार ..

राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो : अजित पवार

मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, असे विधान केले आहे. भाजपाचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज सकाळी अजित पवार यांची भेट घेतली होती. चिखलीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर अजित पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच त्यांची भेट ही सदिच्छा भेट होती, असेही ते म्हणाले. चिखलीकर हे नांदेडमधून ..

विश्वासदर्शक ठरावात ठाकरे सरकार पास

मुंबई, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 169 आमदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मिळाला आहे. यावेळी एमआयएमचे 2, मनसेचे 1, सीपीआयएच्या एका आमदाराने यावेळी तठस्थ भूमिका घेतली. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने या प्रस्तावाच्या विरोधात शुन्य मतं पडली. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. तर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि जयंत पाटील या प्रस्तावाला अनुमोदन दिले.  उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान ..

धुळ्यात भीषण अपघात; ७ जणांचा मृत्यू, २० जखमी

धुळे,धुळ्यामध्ये पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. मजुरांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन उस्मानाबादकडे जात असतांना ही घटना घडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून मजूर घेऊन जाणारी पिकअप व्हॅन खाली नदीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. तर 20 ..

निर्देशांकात 336 अंकांची घसरण

मुंबई,सततच्या कमाईमुळे विक्रमी उंची गाठल्यानंतर, गुंतवणूकदारांनी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या जाहीर होणार्‍या आकड्यांवर नजर ठेवून नफा कमावण्यावर भर दिला. यामुळे मुंबई शेअर बाजारात आज शुक्रवारी 336 अंकांची घसरण झाली.   सकाळपासूनच शेअर बाजारात घसरणीला सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत घसरण 466 अंकांच्या घरात गेली. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात काही कंपन्यांच्या शेअर्सला चांगली मागणी मिळाल्याने घसरण थांबली. दिवसभराच्या उलाढालीनंतर 336.36 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 40,793.81 या स्तरावर ..

डी.एस. कुलकर्णी व त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे,डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जयंत राजे याच्या कोर्टाने फेटाळला. दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर डी. एस. कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांनी जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाला विशेष सरकारी प्रवीण चव्हाण यांनी विरोध केला होता. डी.एस. कुलकर्णी यांच्यातर्फे अॅड. शिवदे यांनी बाजू मांडली होती. डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणुकदारांची फसवणूक केली आहे. आर्थिक फसवणुकीचे कृत्य हे खुनाच्या गुन्ह्या इतके गंभीर आहे, त्यांचा जामीन फेटाळवा ..

आरेतील मेट्रो कारशेड बांधकामाला स्थगिती- मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई,  गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु असलेल्या आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्याचा निर्णय़ कॅबिनेट बैठकीत घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली. 'रातोरात झालेली कत्तल मान्य नाही. आरेमधील एकही पान तोडू दिले जाणार नाही.' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. भाजपा सरकारच्या काळात आरेच्या वृक्ष तोडीली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या कामाला विरोध नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे  ..

वस्त्रोद्योगांना तीन महिन्यात वीजदरात २२५ कोटींची सवलत

   मुंबई, वस्त्रोउद्योगाला चालना देण्यासाठी आणि सूताची विक्री देश-विदेशात व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने धोरणात विशेष वीज योजनेचा समावेश करून विविध प्रकारातील वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात सवलत दिली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगांना नवसंजीवनी मिळाली असून, यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात महावितरणकडून वस्त्रोद्योग युनिटला वीजदरात एकूण २२५ कोटींची सवलत मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक खासगी सूतगिरण्यांना ६१.१४ कोटी आणि सहकारी सूतगिरण्यांना ३७.२६ कोटींची सवलत मिळाली. ही सवलत वर्षाला ..

उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी

मुंबई, दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर राज्यपालांनी दिलीप वळसे-पाटलांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड केली. तर दुसरीकडे उद्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणीही घेण्यात येणार आहे. नव्या सरकारची उद्या अग्निपरीक्षा असून, बहुमत चाचणीचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरेंच्या सरकारला ..

महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली टीका

मुंबई, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा आहेत. तरीही मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा उल्लेखही नाही हे दुर्दैवी आहे असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.  महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, निकाल आणि त्यानंतर घडलेल्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या. शिवसेना आणि भाजपा यांच्या महायुतीला लोकांनी कौल ..

...आणि राज यांच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले

मुंबई,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी संपूर्ण ठाकरे कुटुंब शिवतीर्थावर एकवटले होते. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या काकू आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगामुळे कुंदाताईंना आनंदाश्रू आवरता आले नाही. या भावूक क्षणाने शिवतीर्थावरील जनसागरही हेलावून गेला होता.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ..

मोदी, फडणवीस, गडकरींच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा

मुंबई,शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष ..

उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई,महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज शिवाजी पार्क मैदानावर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला.   शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास ..