मिक्स मिठाई

मतदान केंद्रातील अनुभव...

मृणाल मंगेश भगत/दुर्गे8007352221सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. नुकतेच तिसर्‍या टप्प्यातीलही मतदान पूर्ण झालेले आहे आणि प्रतीक्षा आहे ती निकालाची. या निवडणुकीतील एक खास वैशिष्ट्य म्हणजे या वर्षी प्रत्येक मतदान यंत्रासोबत (इव्हीएम) व्हीव्हीपॅट (व्होटर-व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल) मशीन जोडण्यात आले होते. उमेदवाराला दिलेले मत त्या मशीनमध्ये नोंदले जाऊन मतदार, आपण कुणाला मत दिले आहे हे त्यातील पेपरवर बघू शकतो. या निवडणुकीसाठी 16 लाख व्हीव्हीपॅट मशिन्स, 3174 कोटी रुपये खर्च ..

लहानपण देगा देवा, मनी वसतो गवा..!

यादव तरटे पाटील वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.www.yadavtartepatil.com9730900500 सूर्यकिरणांच्या पिवळ्याधम्म चादरीत पांघरलेल्या जंगलाच दृश्य मनोहारीच असतं. अशा वातावरणात आम्ही तारुबाबा मंदिराजवळून पायी तलावाकडे जात होतो. सिकाड्याचा किर्रऽ किर्रऽऽ आवाज कानात गुंजत होता. मध्येच चितळांचा मोठ्या थव्याने वर्दी दिली. भिरभिर डोळे करत एक एक चितळ रस्ता ओलांडताना पाहून आम्ही थक्क झालो. ताडोबा तलावाजवळ पोहोचताच, मागून गुरुजींचा आवाज कानी पडला. गुरुजी मोठ्याने ओरडले, ‘‘बे पोट्टेहो ..

मातीत गवसलेला ‘रत्न’

मिलिंद महाजन 7276377318भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रतिभावान खेळाडूंचा वाणवा नाही. या भारतभूमीवर रत्नांची खाण आहे. अशा प्रतिभावानरत्नां माळेतील एक मौल्यवान रत्नाची निवड करणे अवघड असते. अशाच रत्नांमधील एक रत्न म्हणजे बजरंग पुनिया. आपल्या शक्ती-सामर्थ्य, कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर बजरंग आज त्रिलोकात आपल्या यशाचे झेंडा फडकवत आहे. मात्र गतवर्षी हा रत्न दुर्लक्षित राहिला व त्यामुळेच त्याचा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार- ‘राजीव गांधी खेल रत्न’ पुरस्कारापासून तो वंचित राहिला. आज नाही मिळाला ..

स्थितप्रज्ञ गोमती

तामिळनाडू राज्यातील तिरुचीराप्पाल्ली गावातील मुलगी- गोमती मरीमुथू. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा दृढनिश्चय करून आपली वाटचाल सुरू ठेवली. तिच्या या कष्टाचे फळ मिळाले. अलिकडेच दोहा, कतार येथे झालेल्या 23 व्या आशियाई अॅथ्लेटिक्स स्पर्धेत गोमतीने 800 मीटर शर्यतीत वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवित भारताला प्रथमच सुवर्णपदक िंजकून दिले.   दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणार्‍या गोमतीने या स्पर्धेत 2 मिनिट 02.70 सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली आणि आपले पहिले आंतरराष्ट्रीय ..

कोल्हापुरचा वनमल्ल : सुहास वायंगणकर

माणसासाठी धावणारे इथे हजारो आहेत; पण मुक्या प्राण्यांसाठी धडपडणारे आजही बोटावर मोजण्या इतकेच..! वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे व कीटकांचे संवर्धन झाले तरच मानवाचे संवर्धन शक्य आहे. हे मानवाच्या अस्तित्वाचं अन आयुष्याच गमक या रानवेड्यांना कळलं, म्हणूनच ते बेभान होऊन या निसर्ग सेवेत तल्लीन होऊन काम करताना दिसतात. म्हणजेच जंगलातल्या या न तुडववेल्या वाटेवरचे हे प्रवासी आपली तहान- भूक विसरून या निस्वार्थ सेवेत मग्न होतात. अशा न तुडवलेल्या वाटांना ना किलोमीटरचे दगड असतात ना त्या वाटेवर गाव लागते. ..

आमिर खान आणि रिंकू राजगुरू

नुकतीच ‘कागर’ या चित्रपटातून सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षकांची मने पहिल्याच चित्रपटातून रिंकूने िंजकली होती. तिला या चित्रपटातील भुमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अशा या रिंकूला बहुमुल्य सल्ला दिला आहे. त्याचबरोबर तिच्या अभिनयाचे कौतुक देखील आमिरने केले आहे.   फेमसली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनेे सांगितले की- माझ्याकडे आमिर खान यांच्याशी बोलताना शब्दच नव्हते. मी त्यांच्या ..

बाभूळ

धुर्‍यावर उभी बाभूळडोक्यावर उन्ह घेऊन....बहरली हिरवीगारअंगावर काटे रोवून....सावलीत मिळे तिच्याबकर्‍यांना हिरवा चारा...दोन घोट पाणी पितोइथे गुराखी सारा....बाभूळ शान रानाचीउन्हात देई दिलासा...जणू अखंड सेवेचाघेतला तिनं वसा...दादा, नको तोडू रेही ..

खेल में पॉलिटिक्स...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळात क्रीडाजगताला नेहमीच प्रोत्साहन लाभले नव्हे क्रीडाजगतात चैतन्य निर्माण झाले. खेळाडूंना वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एवढेच नव्हे, तर ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा, आशियाड क्रीडा अथवा विविध खेळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यावयास जाणार्‍या भारतीय खेळाडूंना समारंभपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि जेव्हा सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक िंजकून मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या पाठीवर प्रेमाने शाब्बासकीची थाप दिली आहे. खेलो इंडियाच्या ..

गुदगुल्या करणारे अस्वल

छकड्याल्या बैल जुतून बाज्या बुडा तयार झाला की आम्ही पहाटेच गाव सोडायचो. बैलांच्या घुंगरांचा छन, छन आवाज करत छकडा पुढे जायचा. मात्र डोंगरी नदी जवळ येताच माझ्या मनात धडकी भरायची. डोंगरी नदीत लहान भूत माट्या आपली वाट अडवतात, असं मी शाळेत ऐकलेलं. नदीत पोहोचताच घुबडाचा घूऽऽ घूऽऽ घूऽ आवाजही कानी पडायचा. मी छकड्यातच बाबांच्या पोटाशी बिलगून बसायचो. बालपणी बाबाबरोबर दारव्ह्याला रविवारच्या बाजारात जायचा आनंद वेगळाच. एक दिवस असेच आम्ही तिघे बाजारात पोहोचलो. दारव्ह्याच्या टोलीपुर्‍यातल्या मोठ्या िंलबाच्या ..

घरटं

‘‘बाबुजी, माझ्याकडे काहीच नाही. फक्त ही झोपडी आहे. ही मी माझ्या घामाच्या कमाईतून बांधलेली आहे. माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच ठेवलं नव्हतं. माझं शिक्षण अर्धवट झालेलं. लहानपणापासून पडेल ती कामं केली. भाजी विकली, उदबत्त्या विकल्या, हमाली केली, उसाचा रस विकायचो. माझा बाप घरी देवपूजा सांगायला जायचा. लोकांसाठी उपवास आणि जप वगैरे करायचा. लोक दक्षिणा द्यायला मागे-पुढे बघायचे, ‘‘हे लोक हरामाचं खातात,’’ म्हणायचे. मला ते आवडेना. मग मी कष्ट करून जगायचं ठरवलं. स्वाभिमान विकला ..

मनभावन ‘पळस!’

पूर्व दिशा जणू केशरी वस्त्र परिधान करून त्या मिहिराच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. सहस्त्रांशूचे कोमल किरणं काळोखाचा परीघ छेदत वसुंधरेच्या मिलनासठी धडपडत होते. तृणाकुरांवरील दविंबदूंचे आच्छादन त्या सोनेरी रविकिरणाने विलग होणारे होते. क्षितीजातून निघणारा सहस्रश्मी वसुंधरेला सावकाश तिमिरातून प्रकाशाकडे नेत होता. संपूर्ण सृष्टीचं त्या मिहिराच्या आगमनाने तेजोमय भासत होती.   हलकेच पाखरांची किलबील मनाला हषूर्ंन जात होती. वसंत ऋतूची चाहूल सर्वत्र जाणवत होती. वृक्षांमधून सृजनशीलता फांदोफांदी ..

मेळघाटी विश्वकोश रवींद्र वानखडे!

‘‘मी रानवेडा, जंगलात भटकणारा, जंगलाच्या प्रेमात कायम बुडालेला, डोळ्यांतल्या हिरवाईसह रानातल्या भन्नाट अनुभवाचा ठेवा असलेला! जंगलात िंहडताना त्याविषयी अधिक संवेदनशील बनलो. वने व वन्यजीव केवळ समजूनच न घेता त्यात जगायला लागलो. वनखात्यात अधिकारी होणार असे मनातही नव्हते, पण माझ्या भोवताली एक तेजोवलय आहे. माझा जन्मच जणू वनांसाठी झाला की काय, असे वाटत राहते. वनविश्वाच्या खोलात जाऊन ते कसे समजून घ्यावे, याचा वस्तुपाठचं मनात मी ठरविलाय. मेळघाट खर्‍या अर्थाने माझा जीव की प्राण! माझी भारतभर ..

निवडणूक आणि मतदान केंद्रावरील फेरफटका

लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून देशात सर्वत्र चर्चेला उधाण आले. तज्ज्ञांचा 2014 आणि 2019 च्या निवडणुकांचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. 11 एप्रिल ते 19 में 2019 पर्यंत 7 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार्‍या या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्यालाच विजय कसा मिळेल, याचा अभ्यास करीत काही प्रमुख पक्षांनी गठबंधनासह विरोधात राहून एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढीत इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर ‘ताल ठोक के’ आणि ‘दंगल’च्या माध्यमातून खुल्या चर्चेतून राजकीय नेत्यांमध्ये मैदानी फड िंजकण्याची जणू ..

बालमित्र कोल्हा

हिरवा डोळा    एक कावळा मांसाचा मोठा तुकडा तोंडात घेऊन उंच झाडावर बसला होता. त्याला पाहून कोल्हा झाडाखाली आला. कावळ्याच्या तोंडातले मांस खाली पडावे यासाठी कोल्ह्याने एक योजना आखली. म्हणून कोल्हा कावळ्याच्या सौंदर्याचे कौतुक करू लगला. कोल्हा म्हणाला, ‘‘अरे कावळ्या, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पाहण्यात अजूनतरी आला नाही. तुझी पिसे किती सुंदर आणि किती कोमल आहेत. तुझ्या शरीराचे तेज पाहून मी भारावलो आहे. तू खरच खूप सुंदर आहेस. खर म्हणजे तुला छान गाताही येत असणार, नाही का..?̵..

ऋतुराज वसंत!

  कुहूऽऽऽ कुहूऽऽऽ अशी कोकिळेची सुरेल लकेर वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देते. वसंत ऋतू! नवचैतन्याने, उत्साहाने सळसळणारा ऋतू! हवेतला गारवा कमी कमी होत जाऊन, सुखद उबदारपणा जाणवू लागतो तो हा ऋतू!चैत्र-वैशाख किंवा मार्च-एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे मानले जातात. निसर्गात नवनिर्मितीची प्रक्रिया याच ऋतूत सुरू होते. शिशिरातील पानगळ थांबून वृक्ष नवीन पर्णांनी सजू लागतात. शिशिरातील आनंद-उत्साह जाणवू लागतो. आंब्याचे झाड मोहोराने फुलून जाते. त्याचा मंद सुगंध वातावरण भारून टाकतो. कोकिळेचे कुजन, पक्ष्यांचे ..

शिकार्‍यांचा शिकारी, विशाल माळी

एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग त्याने एका झटक्यात वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वच या टारझनच्या अवती-भवती िंपगा घालणारं..! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन्‌ या सर्वावर अगदी लिलया स्वार होणारा ड्रीम मॅन म्हणजेच टारझन..! या पात्रान या चिमुकल्याच्या बालमनावर पार गारुड घातलं होत. कथांच्या वर्णनाने अक्षरश: तो झपाटलाच..! झाडावर घर बांधायचं, कंदमुळे खायची, हे एकच खूळ डोक्यात होतं, या खुळापायी तो पार झपाटला होता. टारझन प्रमाणेच ..

वर्षव अमृत धारा!

ढगाळलेलं आकाश! मधूनच विजेचा कडकडाट! रमाच्या मनाची स्थितीही तशीच! मॅट्रीकच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले तरी घरी जाताच आपल्या लग्नाचा विषय निघणार! मैत्रिणीसोबत ‘वहिनीच्या बांगड्या’ हा पिक्चर पाहिलेला त्याचा मनावर जबरदस्त पगडा पडलेला! किती छान छ..

प्रीतीचा पुळका

चहा, कॉफी, कोलिंड्रक्स पित, वेफर्स खात मित्र-मैत्रिणींसोबत मनातल्या गुजगोष्टी करण्यासाठी तो काही कॉलेजचा कट्टा नव्हता. चारचौघात बोलण्यासारख्या, गाववेशीच्या चावडीवर बोलण्यासारख्या गोष्टी नव्हता. अर्थात सार्वजनिक स्थळी चार चौघांना ऐकू जाईल अशा गोष्टी नव्हत्या. अशा गोष्टी मूळातच उघडपणे बोलणे आपल्या भारतीय संस्कृतीत बसत नाही. होय, मी मी कॉफी विथ करण या टीव्ही शोमधील युवा क्रिकेटपटू लोकेश राहुल व हार्दिक पांड्याच्या निर्लज्जपणे केलेल्या स्त्रीविषयक अपमानास्पद विधानाबद्दल बोलत आहो.   वास्तविक ..

गायक

गायक ..

लक्ष्यवर लक्ष

Artival of mahajan ..

सावली

सावली..