नागपूर:

नागपूर

नागरिकत्वात अधिकारांसोबत कर्तव्येही येतात: सरन्यायाधीश शरद बोबडे

नागपूर, 'नागरिकत्व केवळ लोकांच्या अधिकारांपुरते मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांचाही त्यात अंतर्भाव आहे', असे महत्त्वपूर्ण मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आज व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०७ व्या दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश बोबडे बोलत होते.  सरन्यायाधीशांनी यावेळी शिक्षणक्षेत्राच्या विदारक स्थितीवरही कोरडे ओढले. गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक संस्था प्रचंड व्यावसायिक झाल्या आहेत. शिक्षणाच्या या बाजारीकरणाचा अनुभव मी ..

भगवी शिवसेना आता काँग्रेसच्या रंगात रंगलीय: नितीन गडकरी

नागपूर, शिवसेनेसाठी 'भगवा' हे केवळ ढोंग असून शिवसेना सध्या काँग्रेसच्या रंगात रंगून गेली आहे अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट कौल दिल्यानंतर शिवसेनेने सत्तेच्या लालसेपोटी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचा समाचार घेतला. शिवसेनेने केवळ मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:च्या विचारधारेशी तडजोड केली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ..

संपूर्ण कर्जमाफीचा शिवसेनेला विसर; दोन लाखांच्या मदतीची घोषणा

नागपूर,सरसकट संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांना केवळ दोन लाखांची कर्जमाफी देत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देत आपल्याच आश्वसनाला शिवसेनेने तिलांजली दिली आहे. एकीकडे नैसर्गिक आपदेमुळे बळीराजा पुरता संकटात सापडला असतांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देत केवळ दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केल्याने सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.   दरम्यान महविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी ..

मुख्यमंत्र्याच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

नागपूर, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर देशासह राज्यातील राजकारणदेखील चांगलेच तापले आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेससह सहभागी असलेल्या शिवसेनेने या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतल्याने भाजपमधील नाराजी आणखी वाढली आहे. याचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात उमटणार असून पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात ..

न्यायदानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा कोणताही विचार नाही : शरद बोबडे

नागपूर,न्यायिक क्षेत्रात तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर महत्वाचा असला, तरी न्यायदानाच्या प्रक्रियेत त्याचा वापर करण्याची आमची कोणतीही योजना नसल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या बार एसोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.   अयोध्या सारख्या मोठ्या प्रकरणात हजारो पानांचे दस्तावेज आणि पुरावे न्यायालयासमोर येतात. त्यावेळी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी वेळेत त्यांचे अवलोकन करणे ..

नागपूरकरांच्या समस्यांचा आराखडा करणार; तभाच्या भेटीत महापौरांची घोषणा

नागपूर,नागपूर नगरीचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी तरुण भारतच्या एमआयडीसी कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी विभिन्न विषयांवर चर्चा केली आणि नागपूर शहरातील कुठल्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जाव्यात, याबाबतच्या सूचनाही घेतल्या. तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.   महापौरपदाची सूत्रे हाती घेताच वेळेबाबत कटाक्ष असलेले आणि प्रशासनातील खाचखळग्यांची सखोल माहिती असणारे संदीप जोशी ॲक्शनमध्ये आले असून, त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील ..

निर्भयता, नि:स्वार्थता आणि विकास हेच खरे शिक्षण- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

-आयपीईसीच्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य परिषदेचे उद्घाटन  नागपूर,स्वार्थ संपवून नि:स्वार्थता आणते आणि निर्भय बनविते, तेच खरे शिक्षण होय. ज्या ज्ञानातून संवेदनशीलता वाढते आणि इतरांच्या उपयोगात येेण्याचा आनंद मिळतो, ज्या ज्ञानातून माणूस घडतो, तेच खरे शिक्षण. निकालाच्या स्पर्धेत उच्च टक्केवारीने उत्तीर्ण होणे वाईट नाही. पण, उपरोक्त गुणांसह ही टक्केवारी असेल तरच त्याला अर्थ आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. साऊथ पॉईंट स्कूल आणि द रॉयल गोंडवाना ..

संरक्षण खात्याच्या मंदगतीचा उद्योजकांना फटका : नितीन गडकरी

नागपूर,केंद्रीय महामार्ग परिवहन तसेच लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण खात्याच्या मंदगती कारभारावर ताशेरे ओढले. संरक्षण क्षेत्रात नवीन निर्मितीची, नव्या खरेदीची स्थिती अतिशय वाईट आहे. उद्योजकांनी एखाद्या वस्तुची ऑर्डर केली किंवा निर्मितीचा प्रस्ताव ठेवला तर मंजुरीला अनेक वर्ष लागतात. आठ-आठ वर्ष फाईल फिरते. प्रशासनाचे अधिकारी एकमेकांना दोष देत असतात आणि जेव्हा मंजुरी मिळते तेव्हा ती वस्तू कालबाह्य झालेली असते, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. विदर्भ एकानॉमिक्स डेव्हलपमेंट ..

राकाँ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या सुरक्षा रक्षकांच्या कारला अपघात

उपनिरीक्षकासह चौघे किरकोळ जखमी नागपूर, राकाँ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेऊन नागपूरला येण्यास निघालेल्या पटेल यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला एका अज्ञात ट्रेलरचालकाने धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह चौघे जखमी झाले.सोमवारच्या पहाटे दोन ते सव्वादोनच्या सुमारास नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव (पो. स्टे. मौदा) येथे ही घटना घडली. प्रफुल्ल पटेल यांना वाय श्रेणीची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत विशेष सुरक्षा पथकाचे एक पथक नेहमीच असते. नेहमीप्रमाणेच विशेष ..

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द

नागपूर,नागपुरातील हवामान विभागाने विदर्भात अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अंदाज व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या (७ सप्टेंबर) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने उद्या होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे.याबरोबरच, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार ..

आदित्य ठाकरेंनी साधला नागपूरच्या तरुणाई सोबत संवाद

नागपूर, जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज नागपूरमधून झाली. हिंगणा रोड येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांनी 'आदित्य संवाद' या तरुणांसोबतच्या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नागपुरात युतीसंदर्भात प्रशन विचारला असता उत्तर देण्याचं टाळलं. युतीबद्दल मी काहीही बोलणार नाही, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये युतीबद्दल चर्चा झाली आहे, त्यामुळे तेच युतीबद्दल बोलू शकतील. ..